YouTube च्या चुकीचा गुगलला मोठा फटका, भरावा लागणार 1420 कोटी रुपयांचा दंड!

YouTube च्या चुकीचा गुगलला मोठा फटका, भरावा लागणार 1420 कोटी रुपयांचा दंड!

गुगलला हा दंड भरावा लागला तर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड ठरेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गुगलला युट्यूबमुळे तब्बल 1 हजार 420 कोटी रुपयांचा भुर्दंड बसला आहे. युट्यूबवर चिल्ड्रन प्रायव्हसी लॉचे उल्लंघन केल्यानं गुगलला 1420 कोटींचा दंड करण्यात आला आहे. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जाहिरातीसाठी डाटा गोळा करताना युट्यूबने चिल्ड्रन प्रायव्हसी लॉचे उल्लंघन केल्याचं आढळलं आहे.

अमेरिकन फेडरल ट्रेड कमीशनने गुगलला दंड ठोठावला आहे. अजुन या प्रकरणी न्याय विभाग सुनावणी करणार आहे. तिथंही अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशनचा निर्णय काम ठेवला तर आतापर्यंत चिल्ड्रन प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याबद्दल हा सर्वात मोठा दंड ठरणार आहे.

युरोपीय संघानं मार्च महिन्यात गुगलवर 1.49 अरब डॉलर म्हणजेच 117 अब्ज रुपयांचा दंड केला होता. गुगलला दंड ऑनलाइन जाहिरातीत पक्षपात केल्याच्या आरोपावरून करण्यात आला होता.

गेल्या वर्षी जुलै महिन्यातसुद्धा युरोपीय संघानं गुगलला पक्षपाताचा आरोप करत 344 अब्ज रुपयांचा दंड केला होता. हा गुगलला केलेला सर्वात मोठा दंड होता. गुगलवर अनेकदा असा आरोप करण्यात आला आहे. मोबाइलच्या डिव्हाइसचा वापर करून गुगल सर्च इंजिनला चुकीच्या पद्धतीनं दाखवत असल्याचे आरोप गुगलवर झाले आहेत.

Apple च्या 'या' निर्णयाचा भारतीयांना फायदा, स्वस्तात मिळणार iPhone

दीड जीबी पुरत नाही तर 96 रुपयांमध्ये मिळवा दररोज 10 जीबी डेटा, जाणून घ्या पूर्ण ऑफर!

VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या