YouTube वर जाहिरातींमुळे Video सलग पाहता येत नसेल तर करा हे सेटिंग

YouTube वर जाहिरातींमुळे Video सलग पाहता येत नसेल तर करा हे सेटिंग

व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन व्हिडिओ उपलब्ध आहेत. मोफत असलेल्या युट्यूबवर जाहीराती मात्र खूप त्रासदायक ठरतात.

  • Share this:

आजकाल कोणतीही माहिती हवी असेल तर ती गुगलवर शोधली जाते. त्याशिवाय मनोरंजनासाठी किंवा इतर माहितीसाठी सध्या युट्यूबचा वापर सर्वाधिक होतो. व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या युट्यूबवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन व्हिडिओ उपलब्ध आहेत. मोफत असलेल्या युट्यूबवर जाहीराती मात्र खूप त्रासदायक ठरतात. खरंतर व्हिडिओ मोफत दाखवत असताना जाहिरातीमधून मोठी उलाढाल केली जाते.

युट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला आणि जास्त लांबीचा व्हिडिओ असेल तर त्यात ठराविक वेळाने जाहिरात दाखवली जाते. या जाहिराती 3 ते 5 सेकंदानंतर स्कीप करता येतात. पण काही जाहिराती मात्र पूर्णवेळ प्ले होतात. तिथं कोणताही पर्याय नसतो.

व्हिडिओ पाहताना येणाऱ्या या जाहिराती बंद करता येतात. यासाठी तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाइसनुसार युट्यूब जाहिराती बंद करू शकतो.  कोणत्याही संकेतस्थळावरून तुम्हाला मिळणाऱ्या जाहिराती ब्लॉक करणं हे अवैध नाही.

तुम्ही कॉम्प्युटरवर जर इंटरनेट वापरत असाल तर कोणताही ब्राऊजर असेल तर त्यात अॅड ब्लॉकर एक्स्टेंन्शन इन्स्टॉल करता येते. यामुळे व्हिडिओ पाहताना येणाऱ्या अॅड ब्लॉक होतात. इथं सेटिंग केल्यानंतर युट्यूबवर चेक केले तर तुम्हाला अॅड बंद झाल्याचे दिसेल. तुम्ही गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स किंवा इतर कोणताही ब्राऊजर वापरत असाल तर त्यासाठी अॅड ब्लॉकर एक्स्टेंशन अॅप अॅड इन मध्ये घेऊ शकता.

मोबाइलवर व्हिडिओ पाहताना अॅड येऊ नये यासाठी एक ब्राउजर इन्स्टॉल करा. ज्यामध्ये अॅडब्लॉक ब्राउजर सारखा बिल्ट इन अॅड ब्लॉकर असेल. तुम्हाला डिव्हाइस रूट कऱण्याची किंवा बदलण्याची गरज नाही. फक्त युट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी अॅपऐवजी ब्राऊजरचा वापर करायचा आहे.

याशिवाय अॅड ब्ल़ॉक करणारे अनेक अॅपसुद्धा आहेत. त्यासाठी Google Play Store वरून Adblock Browser for Android असं टाइप करा. त्यानंतर येणाऱे अॅप इन्स्टॉल करा आणि त्यात अॅड ब्लॉक करण्याचे पर्याय निवडून फिनिश करा. अॅड ब्लॉ़क होतात की नाही याची खात्री करा. अॅड ब्लॉक करणारे अॅपसुद्धा कधीकधी अॅड दाखवतात.

Published by: Manoj Khandekar
First published: December 16, 2019, 1:11 PM IST
Tags: youtube

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading