नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : Smartphone चा वापर जवळपास सर्वच लोकांकडून केला जातो. स्मार्टफोनमध्ये आता कमीत-कमी 64GB स्टोरेज मिळतो. परंतु स्टोरेज फुल झाल्यानंतर फोनमध्ये अनेक समस्या येतात. जर तुम्हीही स्टोरेज सतत फुल असल्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर काही गोष्टींकडे लक्ष देणं फायदेशीर ठरू शकतं.
ऑनलाइन फोटो-व्हिडीओ सेव्ह करू नका -
फोनमध्ये सर्वात जास्त स्टोरेज फोटो-व्हिडीओमुळे फुल होतं. ही समस्या न होण्यासाठी फोनमध्ये फोटो-व्हिडीओ सेव्ह करू नका. फोटो-व्हिडीओ क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करू शकता. प्रत्येक Google Account सह युजरला 15GB फ्री स्टोरेज मिळतं. इथे फोटो-व्हिडीओ सेव्ह करा.
WhatsApp स्टोरेज -
WhatsApp वर फोटो-व्हिडीओ शेअर केले जातात. ते रिसिव्ह झालेले फोटो-व्हिडीओ गॅलरीमध्ये सेव्ह होतात आणि हळू-हळू स्टोरेज फुल होतं. त्यामुळे WhatsApp सेटिंगमध्ये मीडिया व्हिजिबिलिटी ऑप्शन बंद करा. यामुळे फोटो-व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह होणार नाही.
App Cache -
Smartphone मध्ये जसे Apps ओपन होतात, तसे App चे Cache जमा होऊ लागतात. हे Cache फोनच्या सेटिंगमध्ये App मध्ये हटवता येतात.
स्मार्टफोनमध्ये असे अनेक Apps असतात, ज्याचा वापर जवळपास केला जात नाही. स्टोरेज कमी करण्यासाठी वापरात नसलेले Apps अनइन्स्टॉल करा.
अनेक जण स्मार्टफोनमध्ये मूव्हीज डाउनलोड करतात. या मोठ्या फाइल्समुळे स्टोरेज भरतं. मोठ्या फाइल्स डिलीट करुन तुम्ही फोनमध्ये स्पेस तयार करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news