मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

लॉकडाऊनमध्ये फोन झाला स्लो; घरबसल्या असं ओळखा तुमच्या फोनमध्ये धोकादायक व्हायरस तर नाही ना?

लॉकडाऊनमध्ये फोन झाला स्लो; घरबसल्या असं ओळखा तुमच्या फोनमध्ये धोकादायक व्हायरस तर नाही ना?

नव्या फोनची डेटा सिक्योरिटीही महत्त्वाची आहे. फोन खरेदी केल्यानंतर तो सिक्योर ठेवण्यासाटी पासवर्ड, फिंगर प्रिंट, पॅटर्न लॉक आणि फेस लॉक लावू शकता. असं केल्याने कोणीही नव्या फोनमध्ये कोणत्याही गोष्टी पाहू शकत नाही.

नव्या फोनची डेटा सिक्योरिटीही महत्त्वाची आहे. फोन खरेदी केल्यानंतर तो सिक्योर ठेवण्यासाटी पासवर्ड, फिंगर प्रिंट, पॅटर्न लॉक आणि फेस लॉक लावू शकता. असं केल्याने कोणीही नव्या फोनमध्ये कोणत्याही गोष्टी पाहू शकत नाही.

अनेकदा स्मार्टफोनमध्ये व्हायरसचा अटॅकही होतो, ज्यामुळे फोनमध्ये काही गोष्टी आपोआप होतात. फोनमधल्या व्हायरसमुळे फोनचा डेटाही धोक्यात येऊ शकतो. फोनमध्ये व्हायरस आहे का हे काही गोष्टींमुळे ओळखता येऊ शकतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 एप्रिल : स्मार्टफोन सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोन आता केवळ कॉल, फोटो, कॅमेरा यासाठीच नाही, तर आता अनेक खासगी डिटेल्सही फोनमध्ये सेव्ह असतात. अनेकदा स्मार्टफोनमध्ये व्हायरसचा अटॅकही होतो, ज्यामुळे फोनमध्ये काही गोष्टी आपोआप होतात. व्हायरसमुळे अशा अॅक्टिव्हिटी फोनमध्ये होऊ शकतात. फोनमधल्या व्हायरसमुळे फोनचा डेटाही धोक्यात येऊ शकतो. फोनमध्ये व्हायरस आहे का हे काही गोष्टींमुळे ओळखता येऊ शकतं.

- जर तुमचा फोन अतिशय हँग होत असेल किंवा अतिशय स्लो झाला असेल, तर फोनमध्ये व्हायरस असल्याचा धोका असू शकतो. व्हायरस त्याच्या कामासाठी मेमरी आणि CPU चा उपयोग करतो, ज्यामुळे CPU सतत काम करत राहतो आणि Apps योग्यरित्या काम करत नाहीत.

- जर स्मार्टफोन अधिक डेटाचा वापर करत असेल, तर ते व्हायरस असल्याचं कारण असू शकतं. व्हायरस युजरच्या डेटा सर्व्हरवर अपलोड करत असतो, त्यामुळे इंटरनेटचा अधिक वेगात वापर होतो.

- जर फोनचं इंटरनेट, WiFi आपोआप ऑन-ऑफ होत असेल, तरीही हा फोनमध्ये व्हायरस असल्याचा संकेत ठरू शकतो.

(वाचा - ऑनलाईन शॉपिंगच्या जाळ्यात अडकू नका, असं ओळखा प्रोडक्ट असली आहे की नकली)

- ब्राउजिंग करताना अनेक ठिकाणी अॅड्स येतात. परंतु जर तुमच्या स्मार्टफोनच्या होम स्क्रिनवर किंवा इतर ठिकाणी अश्लील जाहिरात येत असेल, तर हे फोनमध्ये व्हायरस असल्याचं कारण ठरू शकतं.

- अनेकदा ब्राउजिंग करताना काही लिंक्सवर क्लिक केल्यानंतर, एक नवीनच पेज ओपन होतं आणि तुमच्या फोनमध्ये व्हायरस असल्याचं सांगत, तो क्लियर करण्याचं सांगितलं जातं. असे पेज लवकरात लवकर बंद करावेत. यामुळे फोनमध्ये व्हायरस येण्याचा धोका वाढतो.

- जर तुमच्या फोनवरुन आपोआप Unknown कॉल्स किंवा मेसेज जात असतील, तरीही हा व्हायरस असल्याचा धोका असू शकतो. अनेकदा व्हायरस डेटा पाठवण्यासाठी इंटरनेटचा वापर न करता मेसेज किंवा कॉलची मदत घेतो.

First published:

Tags: Smartphone, Tech news