सावधान! लेटेस्ट फोनमध्ये आहे बग, फक्त एका सेटिंगने मोबाइल राहिल सेफ

सावधान! लेटेस्ट फोनमध्ये आहे बग, फक्त एका सेटिंगने मोबाइल राहिल सेफ

तुम्ही जर अँड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन असलेला फोन वापरत असाल तर नवीन अडचणीत सापडू शकता.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : तुम्ही जर अँड्रॉइड 8.0 किंवा त्यानंतरचा लेटेस्ट फोन वापरत असाल तर नवीन अडचणीत सापडू शकता. हॅकर्सनी या डिव्हाइसमध्ये एनएफसी बीमिंगचा वापर करून युजर्सच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल केला आहे. गुगलने या अँड्रॉइड बगमध्ये सुधारणा कऱण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप काही डिव्हाइस धोक्यात आहेत. हा बग अँड्रॉइड 8.0 ओरिओ आणि त्यानंतरच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आहे.

हॅकर्स एनएफसी बीमिंगचा वापर करून फोनमध्ये मालवेअर घुसवतात. ज्या अँड्रॉइड फोनमध्ये एनएफसी आहे ते मोठ्या आकाराच्या फाइल ट्रान्सफर करण्यासाठी वापर करतात. ज्यावेळी दोन डिव्हाइस जवळ असतात तेव्हा अँड्रॉइड बीम ऑटोमेटिक डेटा कॉपी करतात.

अँड्रॉइड बीम युजर्सना एपीके फाइल्स कॉपी करता येते. युजर्सला त्याचा अलर्ट येते. पण हा बग वॉर्निंगचा मेसेज न पाठवताच फाइल्स कॉपी करतो. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार Android 8 Oreo आणि त्यानंतरच्या स्मार्टफोनमध्ये हा बग आहे. अक्टूबर 2019 च्या सिक्युरिटी अपडेटमध्ये गूगलने हा बग CVE 2019-2173 असा फाइल केला आहे.

Alert! बँक खातं रिकामं करणारं APP तुमच्या मोबाइलमध्ये? लगेच करा DELETE

एनफसी अनेबल डिव्हाइस असेल त्यांनी लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट डाऊनलोड करून घ्यावं. गुगल आणि इतर ब्रँडसुद्धा अपडेट देत असतात. तुम्ही जर अजून अपडेट केलं नसेल तर फोनमधील एनएफसी बंद करू शकता. एनएफसी हे एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. ज्याच्या आधारे दोन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये कम्युनिकेशन होतं. याचा वापर कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी होते. यामुळेच यात आलेला बग धोकादायक आहे.

वाचा : काही मिनिटांत मिळणार PAN कार्ड, प्राप्तिकर विभागाची नवी सेवा

तुमच्या मोबाइलवर एनएफसी ऑफ करणं सोपं आहे. यासाठी सेटिंगमध्ये कनेक्टेड डिव्हाइस हा पर्याय निवडा. त्यामध्ये टॉगल डिव्हाइस बंद करा. यामुळे तुमचा मोबाइल कोणत्याही एनएफसी डिव्हाइसला जोडला जाणार नाही आणि संपूर्ण डेटा सुरक्षित राहिल.

धोकादायक 32 पासवर्ड!, तुम्हीही ठेवला असेल तर लगेच बदला

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mobile
First Published: Nov 8, 2019 11:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading