सावधान! एक मेसेज तुमचा फोन हॅक करण्यासाठी पुरेसा, या कंपन्यांच्या मोबाइलला धोका

एक टेक्स्ट मेसेज तुम्हाला पाठवून मोबाईल हॅक केला जाऊ शकतो.मेसेजचा वापर करून हॅकर्स युजर्सना काही सेटिंग करायला लावतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 03:12 PM IST

सावधान! एक मेसेज तुमचा फोन हॅक करण्यासाठी पुरेसा, या कंपन्यांच्या मोबाइलला धोका

मुंबई, 06 सप्टेंबर : तुमच्या फोनवर येणाऱ्या टेक्स्ट मेसेजपासून तुम्हाला सावध रहावं लागेल. कारण अँड्रॉइड फोनमध्ये येणाऱ्या एका मेसेजमुळं तुमचा फोन हॅक होऊ शकतो. चेक पॉईंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या इंटेलीजन्स थ्रेट आर्म, चेक पॉईंट संशोधकांनी सांगितलं आहे की, सॅमसंग, एलजी, सोनी आणि इतर कंपन्यांच्या अँड्रॉइड फोनमध्ये त्रुटी असल्यानं यावर अॅडव्हान्स फिशिंग हल्ला होऊ शकतो.

सिक्युरिटी फर्मने म्हटलं आहे की, हॅकर्स तुमचा फोन हॅक करण्यासाठी ओटीएचा वापर करतात. याचा उपयोग नव्या फोनला अपडेट करण्यासाठी केला जातो. या मेसेजला OMA CP मेसेज म्हटलं जातं. यामध्ये ऑथेन्टिकेशनची गरज कमी असते. यामुळं हॅकर्स या मेसेजचा वापर करतात. हा मेसेज नेटवर्क ऑपरेटरकडून आल्यासारखं वाटतं.

मेसेजचा वापर करून हॅकर्स युजर्सना काही सेटिंग करायला लावतात. या सेटिंगमुळं हॅकर्स मोबाईलमधील इनकमिंग, आउटगोइंग आणि इंटरनेट ट्राफिक प्रॉक्सी सर्व्हरवर रुट करतात. फोन हॅक झाल्याचं युजर्सना समजत नाही. त्यांचा डेटा हॅकर्स सहजपणे वापरू शकतात.

संशोधनात म्हटलं आहे की, सॅमसंगच्या फोनला या मेसेजेसचा सर्वाधिक धोका आहे. हा मेसेज युजर्सना फक्त CP अॅक्सेप्ट करायचा असतो. तो करताच सेटिंगमध्ये बदल होऊन सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. सॅमसंगच्या फोनला ऑथेन्टिकेशनची गरज पडत नाही. तर एलजी, सोनी या फोनसाठी ऑथेन्टिकेशन लागतं. मात्र, यासाठी हॅकर्सना युजरच्या International Mobile Subscriber Identity (IMSI)ची माहिती मिळवावी लागते. हे सोपं असतं.

हॅकर एक Rogue अँड्रॉइड अॅप तयार करतात. हे अॅप IMSI बघतो आणि त्यावरून नेटवर्क ऑपरेटरसारखा मेसेज युजरला पाठवतो. यामध्ये पिन प्रोटेक्टेड मेसेज अॅक्सेप्ट करण्यास सांगितलं जातं. ते करताच CP इन्स्टॉल होतं.

Loading...

चेक पॉईंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या सिक्युरिटी संशोधक साल्वा मक्कावीव यांनी म्हटलं की, अँड्रॉइड फोनची लोकप्रियता आणि वाढता वापर पाहता त्यातील त्रुटी कमी करणं गरजेचं आहे.

VIDEO: रायगडावर हेरिटेज हॉटेल होऊ शकतं? वादग्रस्त निर्णयावर सरकारची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mobile
First Published: Sep 6, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...