Home /News /technology /

तुमचं Gmail अकाउंट बंद तर होणार नाही ना? जाणून घ्या काय आहे सत्य

तुमचं Gmail अकाउंट बंद तर होणार नाही ना? जाणून घ्या काय आहे सत्य

जर तुम्ही गुगलच्या नवीन पॉलिसीनुसार Gmail, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोज वापरले नाही तर 1 जून 2021 नंतर ही सर्व अकाऊंट बंद केली जातील.

    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : गुगल (Google) 1 जून 2021 पासून नवीन पॉलिसी राबवत आहे. त्यानुसार 1 जून 2021 नंतर तुमचे Gmail अकाउंट बंद केले जाऊ शकते. Gmail व्यतिरिक्त गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोज यांसारखे इतर फीचर्स वापरायचे असतील तर तुम्हाला गुगलच्या नवीन पॉलिसीनुसार आपले अकाउंट वापरावे लागेल. जर तुम्ही गुगलच्या नवीन पॉलिसीनुसार Gmail, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोज वापरले नाही तर 1 जून 2021 नंतर ही सर्व अकाऊंट बंद केली जातील. चला गुगलच्या नवीन पॉलिसीबद्दल जाणून घेऊया. गुगलची नवीन पॉलिसी गुगलने 1 जून 2021 पासून नवीन पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीनुसार, युझर्सचे Gmail, गुगल ड्राईव्ह आणि गुगल फोटोजचे अकाउंट दोन वर्षांसाठी निष्क्रिय राहिल्यास गुगल या सर्व अकाउंटमधून तुमचा कंटेंट डिलिट करेल आणि ही खाती बंद करेल. आपल्याला आपले Gmail, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटो खाते वापरायचे असेल तर आपल्याला या अकाउंटवरील अक्टिव्हिटी वाढवावी लागेल, जेणेकरुन हे सर्व अकाउंट गुगलच्या नवीन पॉलिसीनुसार बंद होणार नाहीत. वाचा-Googleवर डेटा सेव्ह करण्यासाठी मोजावे लागणार पैसे; वाचा काय आहे नवी पॉलिसी कंटेंट काढण्यापूर्वी गुगल आपल्या युझर्सना त्याची माहिती देईल गुगलच्या मते, जर आपल्या अकाउंटमधील कंटेंट 2 वर्षांचं स्टोरेज मर्यादेपेक्षा जास्त असेल तर गुगल तुमचा कंटेंट Gmail, ड्राइव्ह आणि फोटोजमधून डिलिट शकतं. त्याचबरोबर, गुगलने हे ही स्पष्ट केलं आहे की कंटेंट काढण्यापूर्वी युझर्सना माहिती दिली जाईल. अशा परिस्थितीत आपले अकाउंट अक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण जेव्हा साइन इन कराल किंवा इंटरनेटवर काम कराल तेव्हा वेळोवेळी आपल्या Gmail, ड्राइव्ह किंवा फोटोजवर जा. याच्या व्यतिरिक्त इनएक्टिव अकाउंट मॅनेजर ही आपले विशेष कंटेंट मॅनेज करायला मदत करू शकते. तसंच नको असलेला कंटेट जीमेल, फोटोज आणि ड्राइव्हवरून तुम्हीच डिलिट करत रहा म्हणजे मर्यादेबाहेर कंटेट सेव्ह होणार नाही. वाचा-Google वापरताय ना? मग हे काम नक्की करा, नाहीतर डिलीट होईल तुमचा सगळा डेटा आपण गुगल अकाऊंट कसे अपग्रेड करू शकता गुगलच्या नवीन पॉलिसीनुसार, युजर गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोजवर 15 GB डेटा मोफत सेव्ह करू शकतात. जर युजरनी 15 GB डेटाची मर्यादा ओलांडली असेल त्यांना किमान 100 GB स्टोरेज सुविधा घ्यावी लागेल. ज्याचा चार्ज दरमहिन्याला 130 रुपये आणि वर्षभरासाठी 1300 रुपये असेल. जर युजरने 200 GB स्टोरेज प्लॅन घेतला तर त्यांना दर महिन्याला 210 रुपये चार्ज भरावे लागेल. त्याचबरोबर 2 TB आणि 10 TB स्टोरेजसाठी युझर्सना दर महिन्याला 650 आणि 3,250 रुपये द्यावे लागतील.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या