मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मोबाइलमधील डेटा आणि चॅट न गमवता WhatsApp नंबर कसा बदलायचा? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

मोबाइलमधील डेटा आणि चॅट न गमवता WhatsApp नंबर कसा बदलायचा? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

iOS मध्ये डार्क मोड ठेवण्यासाठी सर्वात आधी Setting ओपन करा. आता Display and Brightness वर टॅप करुन Dark ऑप्शनवर टॅप करा.

iOS मध्ये डार्क मोड ठेवण्यासाठी सर्वात आधी Setting ओपन करा. आता Display and Brightness वर टॅप करुन Dark ऑप्शनवर टॅप करा.

हे फिचर वापरण्यापूर्वी तुमचं सिमकार्ड (Sim Card) सुरू असणं आणि नेटवर्क (Network) असणं आवश्यक आहे. कारण फिचर वापरण्यापूर्वी तुम्हाला संबंधित नंबरवर ओटीपी (OTP) पाठवला जातो.

    नवी दिल्ली, 21 डिसेंबर : स्मार्टफोन (Smartphone) आणि मोबाइल नंबर (Mobile Number) बदलतेवेळी प्रत्येक युजरला आपल्या व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chats) आता नाहीशा होतील का अशी भीती असते. अँड्रॉइडवरून (Android) आयओएसवर (iOS) किंवा आयओएसवरून अँड्रॉइडवर व्हॉट्सॲप चॅटस ट्रान्सफर करणं हे जर तुम्हाला अजूनही कठीण वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण यावर जुना डाटा न गमावता फोन नंबर बदलणं हा एक सोपा पर्याय आहे. विशेष म्हणजे हा पर्याय अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्हीवर उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही परदेशात जाणार असाल आणि त्याकरिता नवा फोन नंबर घेता त्यावेळी हा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. हे फिचर नेमकं कसं वापरायचं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. परंतु, केवळ नवा मोबाईल नंबर वापरतेवेळीच हे फिचर उपयुक्त ठरतं, हे युजर्सनं लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हे फिचर कसं वापरायचं याची पद्धत सविस्तर जाणून घेऊया...

    हे फिचर वापरण्यापूर्वी तुमचं सिमकार्ड (Sim Card) सुरू असणं आणि नेटवर्क (Network) असणं आवश्यक आहे. कारण फिचर वापरण्यापूर्वी तुम्हाला संबंधित नंबरवर ओटीपी (OTP) पाठवला जातो. जो हे फिचर वापरताना देणं आवश्यक आहे. स्मार्टफोन बदलताना जुना डाटा (Data) कायम ठेवणं ही खरं तर थोडी कठीण गोष्ट आहे. मात्र व्हॉट्सॲपचा नोंदणीकृत मोबाइल नंबर बदलण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरू शकतं.

    वाचा : तुमच्या Instagram Account चा इतर कोणी वापर करत नाही ना? लगेच असं करा Logout

    असा बदला व्हॉट्सॲपचा नोंदणीकृत मोबाइल नंबर

    - सर्वप्रथम व्हॉट्सॲप ओपन करा आणि सेटिंग्जमध्ये जा.

    - अकाऊंट हा पर्याय ओपन करा आणि त्यातील चेंज नंबर (Change Number) हा पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर वरील बाजूला असलेला नेक्स्ट (Next) हा पर्याय निवडा.

    - त्यानंतर तुम्हाला जुना आणि नवा नंबर विचारला जाईल. हे दोन्ही नंबर टाकल्यानंतर पुन्हा वरील बाजूला असलेला नेक्स्ट हा पर्याय निवडा.

    - त्यानंतर तुम्हाला तुमचा निर्णय योग्य आहे का अशी विचारणा करणारा एक मेसेज दिसेल. या स्टेजला तुमच्या कॉन्टॅक्टमधील (Contact) व्यक्तींना या बदलाबाबत सुचित करायचे आहे का असंही विचारलं जाईल.

    - यावेळी तुम्ही सर्व कॉन्टॅक्ट, काही विशिष्ट कॉन्टॅक्ट किंवा कस्टम यापैकी एक पर्याय निवडावा. जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट नोटिफिकेशनवर क्लिक कराल तेव्हा व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट इन्फो (Contact Info) अपडेट करेल.

    - त्यानंतर तुम्ही Done या पर्यायवर क्लिक करा.

    वाचा : Stock आणि Custom Android फोन म्हणजे काय? तुमच्यासाठी कोणता चांगला?

    ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सॲप रिस्टार्ट होईल आणि व्हॉट्सॲप प्रारंभिक प्रक्रियेप्रमाणे येथे देखील नव्या मोबाइल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी मागेल. अशा प्रकारे तुमच्या सर्व चॅटस कायम राहतील आणि केवळ व्हॉट्सॲपचा मोबाइल क्रमांक बदलेल. दरम्यान, 2021 मध्ये व्हॉट्सॲपने आणलेले सर्व फिचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. यात व्हॉट्सॲप पेमेंटस (WhatsApp Payments) आणि बिझनेस ॲपचा समावेश असेल. तसेच आगामी 2022 मध्ये या मेटाच्या (Meta) मालकीच्या मेसेजिंग ॲपमध्ये नवे सहा फिचर्स समाविष्ट होत आहेत, ते देखील तुम्हाला उपलब्ध होतील.

    First published:
    top videos

      Tags: Mobile Phone, Whatsapp, WhatsApp features