टेक्नोलाॅजी

  • associate partner

Disney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, एअरटेल-जिओचे खास प्लॅन्स

Disney+ Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, एअरटेल-जिओचे खास प्लॅन्स

क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आज अखेर संपणार आहे. 19 सप्टेंबरपासून यंदाचा आयपीएलचा हंगाम (IPL 2020) सुरू होत आहे. आयपीएलचे सर्व सामने Disney+ Hotstar VIP वर पाहता येणार आहेत. पण हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन नसेल तर?

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आज अखेर संपणार आहे. 19 सप्टेंबरपासून यंदाचा आयपीएलचा हंगाम (IPL 2020) सुरू होत आहे. आयपीएलचे सर्व सामने Disney Hotstar VIP वर पाहता येणार आहेत.  हे सामने पाहण्यासाठी Disney Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन असणे गरजेचे आहे. मात्र हे सब्सक्रिप्शन तुम्ही खरेदी केले नसेल तरीही तुम्हाला डिझ्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर देत आहेत. खालीलपैकी सर्व प्लॅन्सवर डिझ्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे.

रिलायन्स जिओ 401 प्लॅन

401 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये रोज 3 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल, जिओ टू अन्य मोबाइल नेटवर्क 1000 मिनिट्स आणि 100 एसएमएस रोज मिळणार आहेत.

रिलायन्स जिओ 777 प्लॅन

777 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये रोज 1.5 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. यामध्ये अतिरिक्त 5 जीबी डेटा देखील मिळणार आहे. एकूण 131 जीबी डेटा या प्लॅनमध्ये मिळेल. हा प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल, जिओ टू अन्य मोबाइल नेटवर्क 3000 मिनिट्स आणि 100 एसएमएस रोज मिळणार आहेत.

रिलायन्स जिओ 598 प्लॅन

598 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये रोज 2 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. एकूण 112 जीबी डेटा या प्लॅनमध्ये मिळेल.  या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल, जिओ टू अन्य मोबाइल नेटवर्क 2000 मिनिट्स आणि 100 एसएमएस रोज मिळणार आहेत. याची वैधता 56 दिवसांची आहे.

रिलायन्स जिओ 499 प्लॅन

499 रुपयांच्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये रोज 1.5 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हा प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. हा डेटा पॅक आहे. त्यामुळे ग्राहकांना यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळणार नाही. ग्राहकांना जिओ Apps चा फ्री अॅक्सेस मिळेल.

एअरटेल 448 प्लॅन

448 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये रोज 3 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळणार आहेत. यामध्ये डिझ्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी बरोबरच एअरटेल ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक, Shaw Academy चा एका वर्षाचा ऑनलाइन कोर्स आणि FasTag खरेदीवर 150 रुपयांची सूट मिळेल.

एअरटेल 599 प्लॅन

559 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये डिझ्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी बरोबर रोज 2 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळणार आहेत. याची वैधता 56 दिवसांची आहे.

एअरटेल 401 प्लॅन

401 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.  डिझ्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीच्या एका वर्षाचा वैधतेसह फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. यामध्ये एकूण 30 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. ग्राहकांना यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

एअरटेल 2698 प्लॅन

2698 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. यात रोज 2 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळणार आहेत. यामध्ये डिझ्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी बरोबरच एअरटेल ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक, Shaw Academy चा एका वर्षाचा ऑनलाइन कोर्स आणि FasTag खरेदीवर 150 रुपयांची सूट मिळेल

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 10:50 AM IST

ताज्या बातम्या