मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Laptop चा स्पीड Slow झालाय?, या पाच Tips चा करा वापर, होईल पहिल्यासारखा Speed

Laptop चा स्पीड Slow झालाय?, या पाच Tips चा करा वापर, होईल पहिल्यासारखा Speed

अनेकांना त्यांच्या लॅपटॉप किंवा टॅबलेटमध्ये बॅटरी सेव्हर ऑप्शन असतो याची माहिती नसते. एकदा सेटिंग केल्यानंतर तुमचा लॅपटॉप ऑटोमेटिक बॅटरी सेव्हरवर चालतो. तसंच हा पर्याय डिसेबलही करता येतो.

अनेकांना त्यांच्या लॅपटॉप किंवा टॅबलेटमध्ये बॅटरी सेव्हर ऑप्शन असतो याची माहिती नसते. एकदा सेटिंग केल्यानंतर तुमचा लॅपटॉप ऑटोमेटिक बॅटरी सेव्हरवर चालतो. तसंच हा पर्याय डिसेबलही करता येतो.

काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा स्पीड (Laptop Speed) वाढवू शकता.

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: लॅपटॉपचा (Laptop) प्रोसेसिंग स्पीड स्लो (Processing Speed) झाला, तर अनेक कामं रखडतात. लॅपटॉप स्लो झाल्यामुळे कधी-कधी खूप मनस्ताप होतो, विशेषतः जेव्हा तुम्ही काही महत्त्वाची कामं करत असता आणि लॅपटॉप हळू चालत असल्यामुळे कामाचा वेग कमी होतो. अशा स्थितीतही काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा स्पीड (Laptop Speed) वाढवू शकता. 'झी न्यूज'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

तुमच्या लॅपटॉपच्या कमी झालेल्या स्पीडमुळे तुम्हीही वैतागला आहात का? काम करत असताना अचानक लॅपटॉपचा स्पीड कमी होतो आणि त्या वेळी खूप राग येतो; पण टेन्शन घेऊ नका. आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढण्यास मदत होईल. या टिप्स नेमक्या काय आहेत, ते जाणून घेऊ या.

हेही वाचा-  सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम त्वरित पूर्ण करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

 - तुमच्या लॅपटॉपचा स्पीड कमी झाला असेल तर सर्वांत आधी लॅपटॉप रीस्टार्ट करा. लॅपटॉप रीस्टार्ट केल्याने त्याची कॅशे मेमरी (Cache Memory) क्लिअर होते आणि लॅपटॉपचा स्पीड वाढतो.

- लॅपटॉपमध्ये ब्राउझरचा ( browser) वापर करीत असताना कमीतकमी टॅब्ज उघडा. ब्राउझर विंडोमध्ये तुम्ही जितक्या जास्त टॅब्ज उघडाल, तितका तुमच्या लॅपटॉपची रॅम आणि प्रोसेसरवर जास्त भार येईल. त्यामुळे, ज्या टॅब्जची गरज नाही, त्या बंद करा. अनावश्यक जास्त टॅब्ज उघडून ठेवू नका. असं केल्याने तुमच्या लॅपटॉपच्या स्पीडवर चांगला परिणाम होतो.

हेही वाचा-  स्मार्टफोनमध्ये 'अशी' निवडा पसंतीची भाषा; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

 - काही स्टार्टअप अॅप्स कालांतराने लॅपटॉपमध्ये तयार होतात. त्यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या स्पीडवर परिणाम होतो. कारण हे स्टार्टअप अॅप्स तुमच्या लॅपटॉपचे रिसोर्सेस खर्च करतात; पण तुम्हाला त्याची जाणीव नसते. त्यामुळे अनावश्यक स्टार्टअप अॅप्स काढून टाका.

- लॅपटॉपमधून अनावश्यक प्रोग्राम्स अनइन्स्टॉल करणं हा लॅपटॉपचा स्पीड वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्ही आवश्यक नसलेले प्रोग्राम्स काही काळासाठी अनइन्स्टॉल करण्याचा विचार करू शकता. हे प्रोग्राम्स, गेम्स किंवा कामाशी संबंधित इतर कोणतीही सॉफ्टवेअर्स असू शकतात. असं केल्याने तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढतो.

हेही वाचा-  काय सांगता! ऑफरमध्ये फक्त 2 हजारांना मिळतोय OPPO कंपनीचा हा 5G Smartphone; लगेच करा खरेदी

 - तुमच्या लॅपटॉपच्या बॅकग्राउंडला ( background) सुरू असलेले प्रोग्राम तात्काळ बंद करा. यामुळे, तुमच्या लॅपटॉपचे रिसोर्सेस चुकीच्या कामासाठी खर्च केली जातात. त्यामुळे अनावश्यक प्रोग्राम विंडो बंद करा.

अचानक लॅपटॉपचा स्पीड कमी व्हायला लागतो; पण वरील काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून त्यांचा वापर केल्यास नक्कीच लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यास मदत होईल व तुमच्या कामामध्ये येणारा व्यत्यय दूर होण्यास मदत होईल.

First published:

Tags: Technology