नवी दिल्ली, 29 एप्रिल: सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम (Instagram) एका नव्या टूलच्या सेटवर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्सला या प्लॅटफॉर्मवरुन पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. या नव्या टूलमध्ये क्रिएटर शॉप्स, कॉमर्ससंबंधी मार्केटप्लेस आणि ब्रँडेड कंटेंट मार्केटप्लेस सामिल आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी इन्स्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांच्यासह एका लाईव्ह स्ट्रिमवेळी या आगामी फीचरची घोषणा केली आहे. इनगॅजेटच्या रिपोर्टनुसार, क्रिएटर्स शॉप्समुळे कंपनीच्या सध्याच्या खरेदीच्या सुविधांचा विस्तार होईल, जो व्यवसायात प्रोडक्ट्स विक्री करण्याची परवानगी देतो.
जुकरबर्ग यांनी सांगितलं, की आम्ही अनेकांना शॉप्स सुरू केल्याचं पाहिलं आहे. हा एक व्यवसाय मॉडेलचा भाग आहे. याद्वारे उत्कृष्ट मॉडेल तयार करू शकतो आणि ते उत्तमरित्या विकू शकतो. म्हणूनच सोशल मीडियावर अशा प्रकारचे क्रिएटर्स शॉप्स चांगला पर्याय असल्याचं ते म्हणाले.
जुकरबर्ग यांनी असंही सांगितलं, की कंपनी अशा टूल्सवर काम करत आहे, जो इन्स्टाग्राम युजर्सला आपल्या प्रोडक्टला प्रोत्साहन देण्यासाठी, आपलं प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी पेमेंट करण्यासही सक्षम असेल. यासाठी एका संबंधित रिकमेंडेशन मार्केटप्लेसच्या निर्माणाची गरज असल्याचं ते म्हणाले.
इन्स्टाग्राम एका ब्रँडेड कंटेंट मार्केटप्लेसवरही काम करत आहे, जो स्पॉन्सर्ससह मॅचिंग इन्फ्लुएंसर्सची मदत करेल. रिपोर्टनुसार, या नव्या टूलवर सध्या काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post, Money, Tech news, Technology