मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

YEAR ENDING OFFERS: कार घ्यायचा विचार करताय तर लगेच बूक करा; मिळतोय भरघोस Discount

YEAR ENDING OFFERS: कार घ्यायचा विचार करताय तर लगेच बूक करा; मिळतोय भरघोस Discount

1 जानेवारी 2022च्या पूर्वी कार विकत घेतली, तर तुम्हाला त्यावर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट  मिळू शकतो. सध्या मारूती सुझुकी, ह्युंडाई आणि टाटा अशा कित्येक कंपन्या नवीन गाड्यांवर लाखो रुपयांचा डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसही देत आहेत.

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: तुम्ही जर नवीन कार खरेदी (Buying new car) करण्याचा विचार करत असाल, तर या आठवड्यातच तुम्हाला सर्वात चांगली संधी आहे. 1 जानेवारी 2022च्या पूर्वी कार विकत घेतली, तर तुम्हाला त्यावर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट (Discount on Cars) मिळू शकतो. सध्या मारूती सुझुकी, ह्युंडाई आणि टाटा अशा कित्येक कंपन्या नवीन गाड्यांवर लाखो रुपयांचा डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसही देत आहेत.

कशामुळे मिळतोय डिस्काउंट

खरंतर दरवर्षी डिसेंबर महिन्यात कार कंपन्या अशा प्रकारचे डिस्काउंट (December discount on cars) देत असतात. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी जुना स्टॉक संपण्याच्या हेतूने हा डिस्काउंट दिला जातो. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, कॅलेंडर बदललं की डिसेंबरमध्ये तयार करण्यात आलेल्या गाडीचे मॉडेल (Car model becomes old) लगेच एक वर्ष जुनं होऊन जातं. त्यामुळेच कित्येक डीलर्सही आपल्याकडे असलेला स्टॉक संपवण्याच्या दृष्टीने विविध ऑफर्स (Offers on Cars) देतात. यात मग कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि फ्री अक्सेसरीज अशा विविध ऑफर्सचा समावेश असतो. अर्थात, हा डिस्काउंट केवळ स्टॉकमध्ये असणाऱ्या गाड्यांवरच मिळतो.

जानेवारीत पुन्हा महागणार गाड्या

आत्ताच गाडी घेण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे, जानेवारीमध्ये जवळपास सर्वच कार कंपन्या आपापल्या गाड्यांचे दर वाढवणार (Car companies to increase rates) आहेत. गाडी बनवण्यासाठीचा कच्चा माल महागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अद्याप कोणती कंपनी किती टक्के वाढ करणार आहे हे स्पष्ट झालं नसलं, तरी गाड्या महाग (Cars price hike in January) होणार आहेत हे नक्की.

कोणत्या कंपनीचा किती डिस्काउंट

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझूकी (Maruti Suzuki offers) आपल्या गाड्यांवर 37 ते 89 हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्स (Tata cars offers) 77,500 ते 2.25 लाख रुपयांपर्यंतचा भरघोस डिस्काउंट देत आहे. टाटाच्या हॅचबॅक गाड्यांवर 77,500 रुपयांची, तर हेक्सा गाडीवर सव्वादोन लाख रुपयांची सूट मिळत आहे. दरम्यान, होंडा कंपनी आपल्या गाड्यांवर सर्वात जास्त, म्हणजे तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. नुकत्याच लाँच झालेल्या होंडा सिविक (Honda Civic discount) या लग्झरी सेडान प्रकारातील गाडीवर कंपनी 2.55 लाखांपर्यंतच्या ऑफर्स देत आहे.

एकूणच, तुम्ही गाडी घ्यायच्या विचारात असाल तर ‘कल करे सो आज कर’ या कबीरांच्या वाणीप्रमाणे वागणे फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा जानेवारीमध्ये पुन्हा तुमचे गाडी घेण्याचे स्वप्न आणखी महाग होईल.

First published:

Tags: Car, Discount offer