Yamaha ची FZSFi विंटेज गाडी लाँच; मिळणार ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी

Yamaha ची FZSFi विंटेज गाडी लाँच; मिळणार ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी

भारतीय मार्केटमध्ये यामाहा FZ या गाडीला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ही नवीन गाडी बाजारात आणली आहे. FZ या सीरिजचे फॅन असणाऱ्यांसाठी ही खास विंटेज गाडी लाँच करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर : यामाहा इंडियाने (Yamaha India) FZS-Fi (Yamaha FZS-Fi)ही विंटेज गाडी लाँच केली आहे. भारतीय मार्केटमध्ये यामाहा FZ या गाडीला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ही नवीन गाडी बाजारात आणली आहे. FZ या सीरिजचे फॅन असणाऱ्यांसाठी ही खास विंटेज गाडी लाँच करण्यात आली आहे.

FZS-Fi गाडी खास विंटेज ग्रीन रंगामध्ये येणार असून लेदर सीट कव्हर मिळणार आहे. त्याचबरोबर ग्राफिक्सदेखील वेगळे असणार आहेत. या विंटेज गाडीत महत्त्वाचा खास बदल म्हणजे, यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. यात Yamaha Motorcycle Connect X ॲपच्या मदतीने स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे. 'आम्ही भारतात ग्राहकांना मोटारसायकल चालवण्याचा उत्तम अनुभव देण्यास कटिबद्ध असल्याचं' यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मोटोफुमी शितारा यांनी सांगितलं.

(वाचा - आजच जाणून घ्या कार, बाईकसंबंधी नवे 5 नियम; अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स)

तसंच ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी सारख्या स्मार्ट वैशिष्ट्यांसह व्हिंटेज सीरिज आमच्या FZS-Fi व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. भविष्यात दुचाकी चालकांसाठी असे उत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करत आमच्या मोटारसायकलचा विस्तार करणार असल्यांही ते म्हणाले.

(वाचा - गाड्यांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफर नियमांमध्ये होणार हे मोठे बदल)

Yamaha FZS-FI ABS विंटेज गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत (Ex showroom price) 1,09,700 इतकी असणार आहे. यामाहाच्या भारतातील सर्व अधिकृत मोटारसायकल शोरूममध्ये ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. एफझेड ही बाईक सुरुवातीला डिझाइनमुळे खूप चालली, पण तिचं मायलेज कमी होतं. तरुणाईत ही गाडी इतकी पॉप्युलर झाली की, इतर कंपन्यांनी यामाहा एफझेडसारखं डिझायनिंग करून गाड्या बाजारात आणल्या.

(वाचा - 1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस)

कंपनीने लोकांची पसंत ओळखून नंतरच्या टप्प्यातील गाड्यांच्या मायलेजमध्ये वाढ केली. त्यामुळे दुहेरी फायदा झाला. यामाहाची गाडी, डिझाईन तसंच मायलेजमुळे गाडीची विक्री वाढली. या सेगमेंटमध्ये सुझुकी, बजाज, टीव्हीएस यांची मॉडेल्सही यामाहा एफझेडला टक्कर देऊ शकलेली नाहीत.

Published by: Karishma Bhurke
First published: December 3, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या