Yahoo कंपनीची स्मार्टफोन क्षेत्रात एन्ट्री; 4 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार हा मोबाईल

Yahoo कंपनीचा पहिला स्मार्टफोन लाँच झाला आहे. त्यामुळे तुम्ही नेहमीच्याच स्मार्टफोन कंपन्यांचे मोबाईल वापरुन कंटाळला असाल तर ZTE Blade A3Y हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे 4 हजारांपेक्षा कमी किंमतीत हा मोबाईल मिळणार आहे.

Yahoo कंपनीचा पहिला स्मार्टफोन लाँच झाला आहे. त्यामुळे तुम्ही नेहमीच्याच स्मार्टफोन कंपन्यांचे मोबाईल वापरुन कंटाळला असाल तर ZTE Blade A3Y हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे 4 हजारांपेक्षा कमी किंमतीत हा मोबाईल मिळणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर: Yahoo Moblieने नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. या फोनचं नाव ZTE Blade A3Y असं आहे. हा स्मार्टफोन ZTE या कंपनीने बनवला आहे. पण Yahoo कंपनीच्या नावावर या कंपनीने स्मार्ट फोन्स विकले जाणार आहेत. ZTE Blade A3Y हा या कंपनीचा पहिलाच स्मार्ट फोन आहे. विशेष म्हणजे कंपनीचा पहिलाच फोन अतिशय कमी किंमतीत विकला जाणार आहे. ZTE Blade A3Y चे फिचर्स या फोनमध्ये 5.45 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ZTE Blade A3Y मध्ये 2 जीबी रैम आणि 32 जीबी स्टोरेज मिळतं. फोनचं स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढवण्यात येतं. या स्मार्टफोनला  स्क्रीन रेजोल्यूशन 720x1440 पिक्सल आणि 18:9 चा आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर काम करतो. फोनचा रंग अतिशय सुंदर आहे. हा फोन ग्रेप्स जेली कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनला क्वाड कोर MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे. किती आहे किंमत? ZTE Blade A3Y हा स्मार्टफोन नुकताच यूएस मार्केटमध्ये लाँच झाला आहे. या फोनाची यूएसमधील किंमत $50 आहे. भारतामध्ये हा स्मार्टफोन 3,700 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये युझर्सना अनलिमिटेड टॉकटाइम आणि 4G LTE डेटाची सुविधा मिळणार आहे. सध्या हा फोन यूएस मार्केटमध्ये लाँच झाला आहे. पण इतर देशात हा फोन कधी लाँच होणार आहे याबद्दल ठोस माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्हाला बजेटफ्रेंडली आणि याहूसारख्या ब्रँडचा फोन वापरयचा असेल तर थोडी वाट पाहावी लागेल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: