Xiaomi चा भन्नाट Warm Cup : चहा पिता पिता फोनही चार्ज होणार; किंमत आहे फक्त...

Xiaomi चा भन्नाट Warm Cup : चहा पिता पिता फोनही चार्ज होणार; किंमत आहे फक्त...

Xiaomi ने नुकतंच एक भन्नाट इलेक्ट्रॉनिक गॅजेट बाजारात आणलं आहे. Warm Cup हे त्याचं नाव. नेमका कसा वापरायचा हा वॉर्म कप?

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर :  शाओमी (Xiaomi)चे मोबाईल आता आपल्याकडे सर्रास दिसू लागले आहेत. कमी किमतीत भरपूर फीचर्स देणारा चायनीज फोन अशी शाओमीची ओळख झाली आहे. पण ही मोबाईल कंपनी एअर प्युरिफायर,  स्मार्ट मॉब अशी इतर उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनंसुद्धा तयार करते हे माहीत आहे का? Xiaomi  ने नुकतंच एक भन्नाट इलेक्ट्रॉनिक गॅजेट बाजारात आणलं आहे. Warm Cup या नावाचं हे उपकरण चहा किंवा कॉफीचा कप गरम करण्यासाठी वापरायचा आहे. पण गंमत म्हणजे त्यावर तुमच्या चार्जरशिवाय किंवा वायरशिवाय मोबाईलही चार्ज होईल.

एका तबकडीसारखं किंवा टी कोस्टरसारखं दिसणारं हे गॅजेट वापरायला अगदी सोपं आहे. ऑफिस किंवा घरी हा वॉर्म कप वापरू शकता. यूजर आपली चहा- कॉफी गरम ठेवण्यासाठी या तबकडीचा वापर करू शकतात. कॉफी किंवा चहाचा कप यूजरला या चार्जिंग पॅडवर ठेवावा लागेल. कुठल्याही फोन वायरशिवाय किंवा चार्जरशिवाय या तबकडीवर फोनसुद्धा चार्ज होऊ शकतो.

वाचा - WhatsApp ग्रुपचं 'हटके' नाव ठेवताय? तुमच्यासह इतर मेंबरचं अकाउंट होईल बॅन

पारंपरिक हीटिंग टेक्नॉलॉजी न वापरता हायटेक वायरफ्री टेक्नॉलॉजी या वॉर्म कपसाठी वापरण्यात आली आहे. सिरॅमिकचा बनलेला वॉर्म कप वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे तो धुता येईल. कपला कुठलीही वायर किंवा चार्जर जोडलेला नाही. जेव्हा कप वापरायचा नसेल तेव्हा शाओमी फोन चार्ज करण्यासाठी या चार्जिंग पॅडचा वापर करू शकता.

वाचा - सावधान! WhatsApp अपडेट करू नका, फोनमध्ये निर्माण होतेय समस्या

या वॉर्म कपची किंमत 189 युआन म्हणजे साधारण  2000 रुपये एवढी आहे. भारतीय बाजारात अद्याप हा वॉर्म कप उपलब्ध झालेला नाही.

हा वॉर्म कप कसा वापरायचा हे सांगणारा व्हिडिओ

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 16, 2019, 8:12 PM IST
Tags: xiomi

ताज्या बातम्या