Xioami च्या कमी किमतीच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये आहे 32 मेगापिक्सलचा कॅमेरा; ‘ही’ आहेत फिचर्स

Xioami च्या कमी किमतीच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये आहे 32 मेगापिक्सलचा कॅमेरा; ‘ही’ आहेत फिचर्स

अनेक उत्तम फीचर्स आहेत Xioami च्या स्मार्टफोनमध्ये

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : Xioami नुकताच Redmi Y3 हा स्मार्टफोन लाँच केला. हा फोन डिझाइन करताना कंपनीने बरीच काळजी घेतली आहे. 10,000 पेक्षाही कमी किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत.

Xioami Redmi Y3 डिझाइन हे डॉट नॉच पद्धतीचं असून, या स्मार्टफोनाचा डिस्प्ले 6.26 इंचाचा HD IPS असून, त्याला कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. फोनच्या रियरमध्ये मायक्रो लाइन्स आणि Aura Prism डिझाइन देण्यात आलं आहे. पावरसाठी या फोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली असून, ती एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिसव चालते असा दावा कंपनीने केला आहे.

Mothers Day निमित्त आईला द्या गिफ्ट; उत्तम फीचर्स आणि स्वस्तात मिळताहे ‘हे’ 5 फोन

प्रोसेसर आणि स्टोरेज – प्रोसेसरबाबत सांगायचं झालं तर, या फोनमध्ये तुम्हाला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर निळेल. Andriod 9 Pie - MIUI 10 या प्रणालीवर हा मोबाईल चालतो. फोनमध्ये इंफ्रारेड ब्लास्टर फीचरसुद्धा देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये स्वतंत्र मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. 512GB पर्यंत तुम्ही या फोनचं स्टोअरेज वाढवू शकता. बोल्ड रेड, बता दें कि Redmi Y3 स्मार्टफोन को बोल्ड रेड, एलिगंट ब्लू आणि प्राइम ब्लॅक अशा तीन रंगात हा मोबाईल उपलब्ध आहे.

फोनचा कॅमेरा आहे खास - Redmi Y3 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात तुम्हाला ऑटो HDR मोड मिळेल. यामुळे तुम्ही फुल HD व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. तसंच, 12MP2MP चा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात तुम्हाला गुगल लेन्सचं ऑप्शन मिळेल.

भारतात लवकरच लाँच होणार 'ही' 12 लाखांची बाईक; काय आहेत एवढी फीचर्स?

किंमत – कंपनीने Redmi Y3 चे दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत. 3GB RAM 32GB स्टोअरेज व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत 9,999 रुपये, तर 4GB RAM 64GB स्टोएरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.

First published: May 12, 2019, 4:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading