नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : शाओमी (Xiaomi) लवकरच आपला Smart Door Lock Pro लाँच करणार आहे. या लॉकचं वैशिष्ट्य म्हणजे यात चेहरा पाहून गेट उघडला जाणार आहे. या नव्या स्मार्ट डोअर लॉकमध्ये फेस रिकग्निशन फीचर देण्यात आलं आहे, ज्यात सेफ्टीसाठी विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
शाओमीने स्मार्टफोन्सनंतर आता होम एंटरटेनमेंट, होम सिक्योरिटीसह हाउसहोल्ड वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यात स्मार्ट डोर लॉक प्रो एक खास प्रोडक्ड आहे. यासारख्या अनेक गोष्टींसह शाओमी ग्राहकांपर्यंत आपली पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
असं काम करेल Xiaomi Smart Door Lock Pro -
फिंगर प्रिंट सेंसर आणि पासवर्डसह उघडणारे अनेक लॉक बाजारात उपलब्ध आहेत. परंतु शाओमीच्या स्मार्ट डोअर लॉक ऍपला फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याद्वारे लॉक सिस्टम, आधी चेहरा स्कॅन करेल आणि मग गेट उघडेल. यात अलार्मसह इतरही फीचर्स देण्यात आले आहेत. जर कोणी गेट तोडण्याचा किंवा लॉकसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असेल तर, या अलार्मच्या मदतीने स्मार्टफोनवर नोटिफिकेशन येईल.
शाओमीने काही दिवसांपूर्वी होम सिक्योरिटी सेगमेंटमध्ये 360 डिग्री सिक्योरिटी कॅमेराही लाँच केला. तसंच एन्ट्री लेवल, बजेट, मिड रेंज आणि प्रीमियम स्मार्टफोन्ससह टीव्ही, वायरलेस इयरफोन, जॅकेट, वॉलेट, शूज, बॅकपॅक, टूथब्रशसह अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Xiaomi