Elec-widget

Xiaomi लॉन्च करणार 100 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा फोन

Xiaomi लॉन्च करणार 100 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा फोन

सॅमसंगही गॅलेक्सी ए- सीरिज स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणणार आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट- शिओमी सध्या त्याच्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा 100 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा फोन असेल असा दावा शिओमीने केला आहे. शिओमी इंडियाचे एमडी मनु कुमार जैन यांनी ट्विटरवरून या बातमीला दुजोरा दिला. कंपनी या वर्षाच्या शेवटी 64 मेगापिक्सलचा फोन बाजारात आणणार आहे. यानंतर 100 मेगापिक्सलचा फोनही लॉन्च करण्यात येणार आहे.

Xiaomi चे ग्लोबल वाइस प्रेसिडेंट आणि शिओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन म्हणाले की, सध्या कंपनी 100 मेगापिक्सलच्या स्मार्टफोनवर काम करत आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘आम्ही 100 मेगापिक्सल कॅमेरा फ्लॅगशिपवर काम करत आहोत. 2019 च्या सुरुवातीला आम्ही 48 मेगापिक्सलचा कॅमेरा लॉन्च केला होता. आता सगळ्या फ्लॅगशिपमध्ये हे दिलं जातं. लवकरच आम्ही 64 मेगापिक्सल कॅमेऱ्या घेऊन बाजारात येऊ. यानंतर येईल 100 मेगापिक्सल.’

Samsung आणि Realme ने 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा स्मार्टफोन लॉन्च करण्याचं आधीच सांगितलं होतं. पण आता 100 मेगापिक्सलचा स्मार्टफोन देणारी Xiaomi ही जगातील पहिली स्मार्टफोन कंपनी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सॅमसंगही गॅलेक्सी ए- सीरिज स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणणार आहे. रिपोर्टनुसार गॅलेक्सी ए-70 मध्ये कंपनी 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, कंपनी Mi Mix 4 मध्ये 108 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL सेंसर वापरणार आहे. पण हा फोन कधी लॉन्च होणार याबद्दल कंपनीने काहीच सांगितले नाही.

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...