मुंबई, 25 सप्टेंबर : Xiaomi कंपनीने भारतात नवा स्मार्टफोन रेडमी 8A लाँच केला आहे. फोन लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यावेळी दमदार असा टॅग वापरून या फोनची माहिती दिली आहे. अशीच फीचर दुसऱ्या फोनमध्ये मिळतील पण त्याची किंमत जास्त असेल. त्या तुलनेत रेडमी 8A खूप स्वस्त आहे.
शाओमी इंडियाचे अध्यक्ष मनु जैन यांनी ट्विटरवरून सांगितलं की, या फोनमध्ये युएसबी टाईप सी पोर्ट आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. यासोबतच फोनच्या किंमतीत टाईप सी पोर्ट दिला जाणारा हा पहिलाच फोन असेल.
रेडमी 8 ए आज शाओमी इंडियाच्या युट्यूब चॅनेलवरून दुपारी 12 वाजता लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे लाँच करण्यात आला. यामध्ये फोनच्या किंंमतीची माहिती देण्यात आली आहे. याआधीच्या रेडमी 7 ए फोनच्या किंमतीच्या जवळपास या फोनची किंमत आहे. रेडमी 8ए ची किंमत 6 हजार 499 रुपये इतकी आहे.
32 जीबी स्टोरेज आणि 2 जीबी रॅम असलेला फोन 6 हजार 499 रुपयांना तर 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम असेलेला फोन 6 हजार 999 रुपयांना मिळेल. हा फोन Midnight Black, Ocean Blue आणि Sunset Red अशा तिन रंगात उपलब्ध असेल. 29 सप्टेंबरला फ्लिपकार्ट आणि Mi.com वर उपलब्ध असेल तर Mi Home stores मध्ये 30 सप्टेंबरला मिळेल.
VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.