मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Xiaomi आता करणार मोलकरणीचं काम; पाहा स्मार्टफोन कसा मारणार झाडू-पोछा

Xiaomi आता करणार मोलकरणीचं काम; पाहा स्मार्टफोन कसा मारणार झाडू-पोछा

आतापर्यंत Xiaomi चे स्मार्टफोन वापरलेत, आता शाओमी मोलकरीण म्हणून तुमच्या घरी येणार आहे.

आतापर्यंत Xiaomi चे स्मार्टफोन वापरलेत, आता शाओमी मोलकरीण म्हणून तुमच्या घरी येणार आहे.

आतापर्यंत Xiaomi चे स्मार्टफोन वापरलेत, आता शाओमी मोलकरीण म्हणून तुमच्या घरी येणार आहे.

मुंबई, 16 सप्टेंबर : आतापर्यंत तुम्ही Xiaomi चे स्मार्टफोन वापरले असतील. मात्र आता Xiaomi तुमच्यासाठी मोलकरीण बनून येणार आहे. तुमच्या घरातील सर्व साफसफाईचं काम करणार आहे. त्यामुळे कोरोना लॉकडाऊनमध्ये ऑफिस आणि घर अशा दुहेरी कामाचा बोझा खांद्यावर पडलेला असताना तुम्हाला शाओमीची मदत होणार आहे. Xiaomi ने घराच्या साफसफाईसाठी Mi Robot Vacuum-Mop P robotic हा स्मार्ट रोबोट आणला आहे.

स्मार्टफोन बरोबरच शाओमीने आता होम प्रोडक्ट्स तयार करण्यावर देखील लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे  Mi Robot Vacuum-Mop P robotic. क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून भारतात हा स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर लाँच करण्यात आला आहे. या महिन्यात भारतात हा रोबोट मिळण्यास सुरुवात होणार असून कोरोनाच्या या संकटकाळात नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

या व्हॅक्युम क्लिनरमध्ये 12 प्रकारचे विविध सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. 2- इन-1 स्वीपिंग आणि मॉपिंग फंक्शन, स्मार्ट अॅप कंट्रोल आणि  लेजर डिस्टेंस सेंसर नेव्हिगेशन सिस्टम यामध्ये देण्यात आले आहे. रोबोट व्हॅक्युम क्लिनरमध्ये 2-इन-1 वॉटर कंटेनर आणि  550ml ची एक डस्ट बॅग बसवण्यात आली आहे. यामध्ये क्लीनिंग, मॉपिंग, सक्शन अँड वाईप हे तीन पर्याय देण्यात आले आहेत.  त्यामुळे हाताळण्यासाठी देखील हा रोबोट अतिशय सोपा आहे. हा रोबोट स्मार्ट पद्धतीने तुमच्या घराची स्वच्छता करणार आहे.

यामध्ये क्वॉड कोर कॉर्टेक्स-A7 प्रोसेसर दिला असून गुगल असिस्टंट आणि अमेझॉन अलेक्साला  देखील हे सपोर्ट करतं. त्याचबरोबर Mi Home अॅपमधून देखील या रोबोटला कंट्रोल करू शकतो. एकदा या रोबोटची सेटिंग तुम्ही तुमच्या एमआयच्या अॅपमध्ये केल्यानंतर तुम्हाला काहीही करण्याची गरज पडत नाही. त्याला तीन गिअर देण्यात आले असून त्याच्या वेगावर  तुम्ही नियंत्रण ठेवू शकता.

हे वाचा - Jio IPL Tariff Plans: आयपीएलसाठी जिओचे खास प्लॅन्स, मोबाइलवर कुठेही पाहा सामने

तुम्ही या रोबोटला कामाला लावल्यानंतर सुरुवातीला हा रोबोट तुमच्या घरात फिरून अंदाज घेतो. त्यानंतर तो एक नकाशा तयार करून घरात कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी आहेत याचा अंदाज बांधल्यानंतर तो स्वच्छता करण्यासाठी तयार असतो. बेड आणि कपाटाखाली, याशिवाय घरातील प्रत्येक कोपरा या रोबोटच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगची सुविधा मिळत असून याची बॅटरी कमी झाल्यास हा रोबोट आपोआप चार्जिंग मोडवर जाणार आहे.

जिथं सतत लोकांची ये-जा असते, पाळीव प्राणी आहेत, अशांसाठी हा रोबोट नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. पाळीव प्राण्यांचे केस जमिनीवर गळत असतात. साध्या मॉपच्या मदतीने तुम्ही ते पूर्णपणे स्वच्छ करू शकत नाहीत. मात्र या रोबोटच्या मदतीने तुम्हाला हे सहज शक्य होणार आहे. ऑफिसमध्ये किंवा घरात सतत वर्दळ असेल तर त्यामुळे त्यांच्या चपलांमार्फत घरात धूळ-माती येण्याचं प्रमाणही जास्त असतं. ही धूळ या रोबोटच्या साहाय्याने साफ करणं सोपं होणार आहे.

हे वाचा - सावधान! Sim card क्लोन करून पुण्याच्या CA तरुणीला 2 लाखांचा गंडा

विविध रगांमध्ये हा रोबोट उपलब्ध होत असल्यामुळे तुम्हाला रंग निवडण्याची देखील संधी आहे.  21,999 रुपयांना तुम्हाला हा घरची साफसफाई करणारा स्मार्ट रोबोट मिळणार आहे.

First published:

Tags: Smartphone, Technology, Xiaomi