108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स

108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार Xiaomi, जाणून घ्या फिचर्स

Xiaomi लवकरच 108 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार आहे. याआधी त्यांनी Mi CC9 आणि CC9e फोन लाँच केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : Xiaomi ने काही दिवसांपुर्वी Mi CC9 आणि CC9e चीनमध्ये लाँच केला होता. आता कंपनी याच सिरीजमधला पुढचा फोन शाओमी Mi CC9 Pro लाँच करणार आहे. देशात 24 ऑक्टोबरला हा फोन लाँच होईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान, या फोनची फिचर्स लीक झाली आहेत.

डिव्हाइसची फिचर्स पोस्ट करून एका युजरने फोन कोणता असेल विचार करा असं म्हटलं होतं. त्यानंतर युजरने स्वत:च ती फिचर्स Mi CC9 ची असल्याचं सांगितलं. तसेच फोनची किंमतसुद्धा सांगितली. त्यानुसार 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरीच्या फोनची किंमत 2599 युआन म्हणजे जवळपास 26 हजार रुपये असेल.

वाचा : Xiaomi च्या 20 स्मार्टफोनची फीचर्स बदलली; तुमचाही फोन करा चेक

याआधीच्या रिपोर्टनुसार Mi CC9 मध्ये 108 MP कॅमेरा आहे. असा कॅमेरा फक्त शाओमीच्या Mi Alpha Mix फोनमध्ये आहे. यूजरने म्हटलं आहे की, 108 मेगापिक्सेल कॅमेऱ्याशिवाय या फोनमध्ये 13 मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स असेल. तसेच शाओमी Mi CC9 Pro मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर असेल.

वाचा : कोट्यवधी ग्राहकांचा मोबाइल क्रमांक होऊ शकतो बंद, 31 ऑक्टोबरपर्यंतचीच आहे मुदत

फोनची बॅटरी 4,000 mAh असेल. त्याला 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. Mi CC9 Pro फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत 6.4 इंचाचा HD अॅमोलेड डिस्प्ले असेल. याशिवाय इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असणार आहे.

वाचा : SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का, 1 नोव्हेंबरपासून होणार हा बदल

वाचा : PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

First published: October 22, 2019, 10:09 AM IST
Tags: technology

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading