मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /12 बाटल्यांपासून Xiaomi ने तयार केला टी-शर्ट, जाणून घ्या किंमत

12 बाटल्यांपासून Xiaomi ने तयार केला टी-शर्ट, जाणून घ्या किंमत

वेगवेगळ्या पद्धतीच्या साधनांचा वापर करून कंपनीने हा एक मेड इन इंडियाचा उत्तम टी-शर्ट आणला आहे.

वेगवेगळ्या पद्धतीच्या साधनांचा वापर करून कंपनीने हा एक मेड इन इंडियाचा उत्तम टी-शर्ट आणला आहे.

वेगवेगळ्या पद्धतीच्या साधनांचा वापर करून कंपनीने हा एक मेड इन इंडियाचा उत्तम टी-शर्ट आणला आहे.

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : टीशर्ट म्हटलं की कॉटन किंवा सिल्क किंवा मिक्स कपड्याचा वेगवेगळ्या ब्रॅण्डमधला आपल्या डोळ्या समोर येतो. इलेक्ट्रोनिक्स वस्तू तयार करणाऱ्या शाओमी कंपनीने आता कपड्यांच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने अनोख्या आणि हटके पद्धतीचा टी-शर्ट लाँच केला. 12 प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून हा टी-शर्ट तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

वेगवेगळ्या पद्धतीच्या साधनांचा वापर करून कंपनीने हा एक मेड इन इंडियाचा उत्तम टी-शर्ट आणला आहे. हा अगदी सहजपणे शरीरातील घाम शोषू शकतो असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय हा टी-शर्ट रिसायकल देखील होऊ शकतो असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचा-Android युजर्ससाठी Googleचं नवं फीचर, समजू शकेल कोण कॉल करतंय आणि काय कारण आहे

Mi.in वरून मिळलेल्या माहितीनुसार टी-शर्टसाठी पॉलिस्टर कपडा वापरण्यात आला आहे. हा टी शर्ट हाताने, मशीनमध्येही धुवू शकता. केवळ प्रिंट केलेल्या भागावर इस्री करू नये असा सल्लाही कंपनीकडून देण्यात आला आहे. हा टीशर्ट एमआय डॉट कॉमवर उपलब्ध होणार आहे. याची किंमत फक्त 999 रुपये आहे. या टीशर्टसोबत इकोफ्रेन्डली पॅकेजिंग देण्यात आलं.

हा नुकताच बाजारात आलेला हा टी-शर्ट रिसायकल करता येईल असा कंपनीने दावा केला आहे. मेड इन इंडिया अंतर्गत हा टी-शर्ट तयार करण्यात आला आहे. हा टी-शर्ट Miच्या ऑफिशियल वेबसाईटवर खरेदी करता येणार आहे.

First published:

Tags: Techonology, Xiaomi