Xioami च्या फॅन्सना खुशखबर, आता वेंडिंग मशीनमध्ये पैसे टाकून खरेदी करा स्मार्ट फोन

Xioami च्या फॅन्सना खुशखबर, आता वेंडिंग मशीनमध्ये पैसे टाकून खरेदी करा स्मार्ट फोन

Xiaomi स्वस्त फोन्सबरोबर आता लाइफस्टाइल प्राॅडक्टसवर लक्ष केंद्रित करतंय.

  • Share this:

मुंबई, 14 मे : Xiaomi स्वस्त फोन्सबरोबर आता लाइफस्टाइल प्राॅडक्टसवर लक्ष केंद्रित करतंय. बल्ब, वायरलेस झाडू यानंतर कंपनीनं आता ‘Mi Express Kiosk’ आणायची तयारी केलीय. कियोस्क एक वेंडिंग मशीन आहे. त्यात तुम्ही शियोमीचे स्मार्टफोन्स आणि एक्ससेरीज खरेदी करू शकता. कंपनीचं हे प्राॅडक्ट आल्यानंतर लोकांना फोन खरेदी करण्यासाठी सेलची वाट पाहावी लागणार नाही. वेंडिंग मशीनमधून चाॅकलेट, वेफर्स बाहेर येतात तिथे आता शियोमीचे फोन्स येतील.

या आहेत भारतातल्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार्स, कोण आहे नंबर 1?

क्रेडिट आणि डेबिट कार्डानं भरा पैसे

शियोमीचे ग्लोबल व्हीपी मनू कुमार जैननं बंगळुरूच्या मान्यता टेक पार्कात पहिल्यांदा कियोस्कचं उद्घाटन केलं. या कियोस्कमध्ये कुठल्याही प्रकारे पेमेंट करता येतं. ग्राहक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश किंवा UPIमधून पैसे ट्रान्सफर करणं. वेंडिंग मशीनमधून कुठलीही वस्तू सहज खरेदी करता येते.

सावधान, WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका, कोणीही पाहू शकतं तुमचं चॅट

कियोस्क मशीनबरोबर या ब्रँडनं एक नवी रिटेल स्ट्रॅटेजी सुरू केलीय. यामुळे कंपनी थेट ग्राहकांपर्यंत पोचते. यामुळे कंपनीचा खर्च वाचतो.  शियोमीच्या म्हणण्याप्रमाणे Mi Express Kiosk  मुळे लोकांपर्यंत जास्त जाता येईल. आॅफलाइन मार्केटमध्ये लोक वेंडिंग मशीनमधून फोन खरेदी करू शकतात. कंपनीनं सांगितलं की कियोस्कवर तीच किंमत असेल जी Mi.com वर असते.

अमेझाॅननं आणलीय नवी संधी, 'या' अटीवर कंपनी देतेय 7 लाख रुपये

याआधी Xiaomi नं लाँच केला Smart Bulb

Xiaomi नं नुकताच Mi LED Smart Bulb लाँच केला. या बल्बमध्ये Mi Home अॅपचा आधार दिला. याच्या मदतीनं ग्राहक बल्बला On किंवा Off करू शकतात. शियोमीचा हा दावा आहे की LED बल्ब 11 वर्ष चालतो. हा स्मार्ट बल्ब 1.6 कोटी कलरला सपोर्ट करणार.

SPECIAL REPORT : रोहित ठरणार का शरद पवारांचा राजकीय वारसदार?

First published: May 14, 2019, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading