26 मे : शियोमीने चीनमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये एमआय मॅक्स-२ हा फॅबलेट लाँच केलाय. 4 GB रॅम, 64 GB स्टोरेज तसंच 4 GB रॅम, 128 GB स्टोरेज या दोन प्रकारांत हा फॅबलेट ग्राहकांसाठी उपलब्ध असणारेय. मागच्या वर्षी शियोमीकडून दावा करण्यात आला होता की, लाँचिंगनंतरच्या दोन महिन्यात एमआय मॅक्स-२ या फॅबलेटची 1.5 मिलियन्स युनिट विकली जातील.
काय काय आहे एमआय मॅक्स-२ फॅबलेटमध्ये ?
डिस्प्ले : 6.44 इंच
प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन ६२५ १४nm FinFET
बॅटरी : 5300 mAh
कॅमेरा : सोनी IMX386 Camera(1.2 मायक्रॉन पिक्सल्स)
अन्य फीचर्स : फिंगरप्रिंट सेंसर, आयआर ब्लास्टर, स्टीरियो साउंड, ड्युअल एलईडी फ्लॅश
याबरोबरच शियोमीने असा दावा केलाय की, एमआय मॅक्स-२ मध्ये वन-हँड यूजला इम्प्रूव्ह केलंय. जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, म्हणजेच एका तासात तब्बल 68% चार्ज होवू शकेल.तसंच याची बॅटरी २ दिवसांचा बॅकअप देईल.
याची किंमत आहे 18,700 रुपये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.