मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Xiaomi Diwali With Mi Sale: स्वस्तात खरेदी करा TV, स्मार्ट वॉच, हेडफोन्स! या आहेत धमाकेदार ऑफर

Xiaomi Diwali With Mi Sale: स्वस्तात खरेदी करा TV, स्मार्ट वॉच, हेडफोन्स! या आहेत धमाकेदार ऑफर

एमआय स्मार्ट होम प्रॉडक्ट आणि स्मार्ट व्हेरिएबल प्रॉडक्टवर आता 2 हजार रुपयांपर्यंची सूट मिळणर आहे. 16 ऑक्टोबरपासून या सेलला सुरूवात झाली आहे.

एमआय स्मार्ट होम प्रॉडक्ट आणि स्मार्ट व्हेरिएबल प्रॉडक्टवर आता 2 हजार रुपयांपर्यंची सूट मिळणर आहे. 16 ऑक्टोबरपासून या सेलला सुरूवात झाली आहे.

एमआय स्मार्ट होम प्रॉडक्ट आणि स्मार्ट व्हेरिएबल प्रॉडक्टवर आता 2 हजार रुपयांपर्यंची सूट मिळणर आहे. 16 ऑक्टोबरपासून या सेलला सुरूवात झाली आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर : Diwali With Mi Sale या शाओमीच्या (Xiaomi) सेलला सुरुवात झाली आहे. एमआय स्मार्ट होम प्रॉडक्ट आणि स्मार्ट व्हेरिएबल प्रॉडक्टवर आता 2 हजार रुपयांपर्यंची सूट मिळणर आहे. 16 ऑक्टोबरपासून या सेलला सुरूवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे याच दिवशी फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज या सेललाही सुरूवात होत आहे. आणि त्याच्या एक दिवसानंतर ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सुरू होणार आहे.

कोरोना काळात ऑनलाईन शॉपिंगला मोठी मागणी आहे. यामुळे ऑनलाईन मार्केटिंगला गती मिळत आहे. दिवाळीसाठी लोक मोठ्या संख्येने खरेदी करतात, हेच पाहता अनेक कंपन्या विविध डिस्काउंट, ऑफर्स जाहीर करत असतात. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टनेही नो कॉस्ट ईमआय आणि इन्स्टंट डिस्काउंट अशा सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र ग्राहाकांनी खरेदीपूर्वी डिव्हाईस तपासून घ्यावे, असा सल्लाही दिला जात आहे.

हे वाचा - Paytm मधून पैसे कट, पण ट्रान्झेक्शन फेल; डोंट वरी असे मिळतील संपूर्ण पैसे

शाओमी एमआय आणि रेडमीच्या फोनवर 10 हजारांपर्यंतची सूट आहे. यासह ग्राहक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सेलमध्ये एमआय डॉट कॉम, फ्लिपकार्ट तसंच एमआय होम स्टोरवर नवीन लाँच झालेल्या एमआय 10 टी (Mi 10T) आणि एमआय 10 टी प्रो (Mi 10T Pro) हे मॉडेल घेऊ शकतात.

एमआय टीव्ही 4 A प्रो (MI TV 4A PRO)

एमआयचा 4 A प्रो हा टिव्ही डिस्काउंटमध्ये 21999 रूपयात मिळणार आहे. याची मूळ किंमत 22499 आहे. ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या कार्डवर 1 हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. यासह बजाज फायनान्सवर नो कॉस्ट इमआयचा पर्याय उपलब्ध आहे. यात इंस्टॉलेशन आणि शिपिंग मोफत आहे. एमआय टीव्ही 4 A प्रो स्पोटर्स 43 इंची फूल एचडी एलईडी असून जो 178 डिग्री व्ह्युविंग अँगल देतो. याला तीन युएसबी पोर्ट असतील.

एमआय टिव्ही स्टिक, एम आय बॉक्स 4 K (MI TV STICK, MI BOX 4K)

एमआय टिव्ही स्टिक आणि एमआय बॉक्स 4 K वर अनुक्रमे 500 आणि 200 रूपयांची सूट आहे. हे 2299 आणि 3299 रूपयांना मिळणार आहेत.

हे वाचा - सावधान! ऑनलाइन शॉपिंग करताना नकली सामान देऊन होतेय फसवणूक, वाचा अशावेळी काय कराल

स्मार्ट वॉटर प्युरीफायर (MI SMART WATER PURIFIER)

एमआयच्या स्मार्ट वॉटर प्युरिफायरची किंमत 2 हजार ते 10,999 पर्यंत कमी झाली आहे. बँक ऑफ बडोदा आणि ॲक्सिस बँकेच्या कार्डवर 1 हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. बजाज फायनान्सवर नो कॉस्ट इएम आय उपलब्ध आहे. एमआय स्मार्ट होम ॲप वापरून हा प्युरिफायर कंट्रोल करता येऊ शकतो. या अपमध्ये पाण्याची शुद्धता पातळी पाहता येऊ शकते.

एमआय वायरलेस हेडफोन (MI TRUE WIRELESS EARPHONES 2)

एमआयच्या वायरलेस इअरफोनवर 1 हजारांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. Mi TWS Earphones 2 sport 14.2mm डायनामिक ड्रायव्हरर्ससह 5.0 ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी, फास्ट चार्जर टेक्नोलॉजी, smart in-ear detection असे फिचर्स देण्यात आले आहेत.

हे वाचा - Tricks and Tips: Google प्ले स्टोरमध्ये करा या 3 सेटिंग्स; बॅटरीसह डेटाचीही बचत

First published:

Tags: Xiaomi, Xiaomi redmi