Xiaomi लवकरच आणणार 7 पॉप-अप कॅमेरा असलेला फोन, PHOTO झाले लीक

Xiaomi लवकरच आणणार 7 पॉप-अप कॅमेरा असलेला फोन, PHOTO झाले लीक

शाओमीचा 4 किंवा 5 नाही तर आता चक्क 7 कॅमेरा असलेला मोबाईल फोन लवकरच येणार असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी: हुआईनंतर आता शाओमी (Xiaomi )कंपनीनेही 7 कॅमेरा असलेला मोबाईल फोन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉप अप कॅमेऱ्याचा वाढता ट्रेण्ड लक्षात घेता शाओमीनेही अशा पद्धतीनं 7 pop up camera असणारा फोन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 4 ते 5 कॅमेरा असलेला मोबाईल फोन सध्या बाजारात ग्राहकांना अगदी सहज उपलब्ध होत आहे. मात्र आता चक्क 7 कॅमेरा असलेला फोन लवकरच बाजारात येणार आहेत. या मोबाईलचे फोटो लीक झाल्यानं या मॉडेलची तुफान चर्चा होत आहे.

चाइना नेशनल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशनच्या वतीनं 7 कॅमेरा असलेल्या मोबाईलचं मॉडेल पेटंट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाइन तयार केले आहेत. तीनही डिझाइन दिसायला एकसारखे दिसत असले तरीही याची संख्या वेगळी आहे.

हेही वाचा-Jio टक्कर देण्यासाठी Vodafoneचा नवीन प्लान! 99 रिचार्जवर मिळवा बंपर ऑफर

यामध्ये फ्रेंट ड्युअल सेल्फी कॅमेरा आणि 5 प्रायमरी कॅमेऱ्याची सुविधा मिळणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. तर या मॉडेलमध्ये तुम्ही पाहू शकता की 7 कॅमेरा असलेले सेंसरही देण्यात आले आहेत.

पहिल्या मॉडेलमध्ये पाहिलं तर 5 कॅमेरा असलेला पॉप अप तर दुसऱ्या मॉडेलमध्ये तीन आणि तिसऱ्या मॉडेलमध्ये 2 पॉपअप कॅमेरा दाखवण्यात आले आहेत. इतर कॅमेरे हे प्रायमरी असतील. यामध्ये किती मेगापिक्सेलपासून सुरुवात असेल याचा फोकल पॉइंट किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र हुआईला टक्क देण्यासाठी आता शाओमी स्पर्धेत उतरणार आहे.

हेही वाचा-TikTokने Facebookला मागे टाकलं, एका महिन्याची कमाई वाचून थक्क व्हाल

हेही वाचा-Royal Enfield ची नवी Himalyan लवकरच होणार लाँच, असा असेल लूक आणि फीचर्स

First Published: Jan 16, 2020 01:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading