मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /2021 मधील सर्वात हलका आणि पातळ बजेट स्मार्टफोन, 64 MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स

2021 मधील सर्वात हलका आणि पातळ बजेट स्मार्टफोन, 64 MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स

तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शाओमीचा लेटेस्ट फोन Mi 11 Lite ऑफर्ससह उपलब्ध केला जात आहे.

तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शाओमीचा लेटेस्ट फोन Mi 11 Lite ऑफर्ससह उपलब्ध केला जात आहे.

तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शाओमीचा लेटेस्ट फोन Mi 11 Lite ऑफर्ससह उपलब्ध केला जात आहे.

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : शाओमी स्मार्टफोनची पॉप्युलॅरिटी मोठी आहे. कंपनीही ग्राहकांच्या गरजा, पसंती लक्षात घेता आपल्या प्रोडक्टमध्ये नवे फीचर्स लाँच करत असते. महत्त्वाची बाब म्हणजे कमी किंमत असूनही कंपनी फोनमधील फीचर्समध्ये कोणतीही कमी ठेवत नाही. जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शाओमीचा लेटेस्ट फोन Mi 11 Lite ऑफर्ससह उपलब्ध केला जात आहे.

Mi.com ने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन सुरुवातीच्या 20,499 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. तसंच ग्राहकांनी हा फोन खरेदी करण्यासाठी SBI कार्डचा वापर केल्यास, त्यांना 1500 रुपये इन्स्टंड डिस्काउंट दिला जाईल. Mi 11 Lite हा फोन 2021 मधील सर्वात हलका आणि पातळ स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने दिला आहे.

Mi 11 Lite स्पेसिफिकेशन्स -

- 6.55 इंची full-HD+ (1,080×2,400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले

- 90Hz रिफ्रेश रेट

- 20:9 आस्पेक्ट रेशियो

- कॉर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन

- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर

- Adreno 618 जीपीयू

- 8GB पर्यंत रॅम

- 4,250 mAh बॅटरी

- 33 W फास्ट चार्जिंग

रस्त्यावर वेगात वाहन चालवत असाल तर सावधान! स्पीड ट्रॅकर कॅमेराची अशी राहिल नजर

ऑफर Mi.com पर मिल रहा है.

कॅमेरा -

Mi 11 Lite फोनला ट्रिपल लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स, 5 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेराने 30fps फ्रेम रेटवर 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. तसंच फोनमध्ये लो-लाईट शूटसाठी LED फ्लॅश देण्यात आला आहे.

USB Type-C पोर्ट असून फोनला 3.5 mm हेडफोन जॅक देण्यात आलेला नाही. फोनचं वजन 157 ग्रॅम असून वजन कमी करण्यासाठी मॅग्नेशिअम अलॉयचा वापर करण्यात आला आहे.

तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवतील या स्मार्ट Tips, वाचा Security Tricks

किंमत -

Mi 11 Lite च्या 6 GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,499 रुपये आहे. तसंच 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,499 रुपये आहे.

First published: