नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: सोशल मीडियावर फेसबुक आणि ट्विटर (Facebook and Twitter) यांची क्रेझ प्रचंड आहे. गुगल सारख्या सर्च इंजिनमध्ये आघाडीवर असलेल्या कंपनीने या दोघांना मागे टाकण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. फेसबुक आणि ट्विटरची सोशल मीडियावरील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी 'डब्लूटी: सोशल' (WT:Social) आले आहे. विकीट्रिब्यून (WikiTribune) ही सेवा याआधीच सुरु झाली असली तरी आता त्याचा विस्तार होत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय वेबसाईट असलेल्या विकिपीडिया (WikiPedia) या मुक्त ऑनलाईन माहिती कोषाच्या संस्थापकांकडून WT:Social सुरु करण्यात आले आहे.
WT:Socialचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे विकिपीडियाप्रमाणेच हे देखील निधी गोळा करून खर्च चालवणार आहे. फेसबुक आणि ट्विटर जाहिरातींद्वारे पैसे मिळवते. पण WT:Social फक्त त्यांना मिळालेल्या निधीवर अवलंबून असणार आहे. विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांनी WT:Social बद्दल बोलताना सांगितले की, आमची थेट स्पर्धा फेसबुकशी असणार आहे. युझर्स WT:Socialवर त्यांचे विचार व्यक्त करू शकतील. सध्या सोशल मीडियावर नको तो मजकूर मोठ्या प्रमाणात दिला जातो. यामुळे युझर्सचा काही फायदा होत नाही तर फक्त कंपन्यांचा खिसे भरले जातात.

युझर्सची गोपनियता सुरक्षित ठेवून WT:Socialवर चुकीच्या पोस्ट दुरुस्त करता येतील. फेक न्यूजचा वापर करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. WT:Socialवर युझर्सना कोणत्याही प्रकारची जाहिरात दिसणार नाही. युझर्सकडून मिळणाऱ्या निधीवरच WT:Socialचे काम चालेल असे वेल्स यांनी सांगितले. WT:Socialची सुरुवात विकीट्रिब्यून या नावाने सुरु झाली होती. या वेबसाईटवरील कम्युनिटी फॅक्टचेकिंगच्या माध्यमातून बातम्यांची विश्वासार्हता जपली जाते.
WT:Socialवर लॉगइन मोफत असले तरी तुमचे अकाऊंट अॅक्टीव्ह होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. आतापर्यंत या नव्या सोशल मीडिया वेबसाईटवर दोन लाखाहून अधिक युझर्सनी अकाऊंट उघडले आहे. तर इतकेच लोक अकाऊंट अॅक्टीव्ह होण्याची वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.