मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Social Media : तरुणांनो, सोशल मीडियाचा चुकीचा वापर येईल अंगलट, ‘या’ गोष्टी करताना घ्या विशेष काळजी

Social Media : तरुणांनो, सोशल मीडियाचा चुकीचा वापर येईल अंगलट, ‘या’ गोष्टी करताना घ्या विशेष काळजी

Social Media : तरुणांनो, सोशल मीडियाचा चुकीचा वापर येईल अंगलट, ‘या’ गोष्टी करताना घ्या विशेष काळजी

Social Media : तरुणांनो, सोशल मीडियाचा चुकीचा वापर येईल अंगलट, ‘या’ गोष्टी करताना घ्या विशेष काळजी

Social Media Tips: तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटला भेट दिली किंवा कुठे फिरायला गेला, तर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करता का? सोशल मीडियावर तुम्ही कोणाशी संवाद साधता याविषयी तुम्ही निष्काळजी आहात का? उत्तर हो असेल, तर हा निष्काळजीपणा तुमच्या अंगलट येऊ शकतो.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 31 ऑगस्ट: तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटला भेट दिली किंवा कुठे फिरायला गेला, तर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करता का? सोशल मीडियावर (Social Media Tips for Youth) तुम्ही कोणाशी संवाद साधता याविषयी तुम्ही निष्काळजी आहात का? जर उत्तर होय असेल तर तुम्ही पुण्यातील नेहल देवधर (नाव बदलले आहे) सारखं मोठ्या संकटात सापडू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी नेहलनं सोशल मीडिया साइटद्वारे त्याच्या बँकेशी संपर्क साधला. पण असं करण्यासाठी ती चुकून तिच्या बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा सारख्याच बनावट खात्याच्या संपर्कात आली. नेहलनं नेटबँकिंगचा तपशील आणि पासवर्डही दिला. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी तिचं खातं हॅक करून तिच्या पैशांच्या माध्यमातून एका तासात मोठ्या रकमेची ऑनलाइन खरेदी केली.

तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवं की, सोशल मीडियावरील तुमच्या पोस्ट्स केवळ मित्र किंवा फॉलोअर्सनाच आवडतात असं नाही, त्यावर फसवणूक करणारे आणि हॅकर्सही लक्ष ठेवून असतात.  एक्सपेरियन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मोहन जयरामन यांनी सांगितले की, स्मार्टफोनची कमी सुरक्षा आणि सोशल मीडिया साइटवर वैयक्तिक माहिती देणे यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. “मोबाइल उपकरणे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या आगमनाने ओळख चोरीच्या पद्धती बदलल्या आहेत. आता वैयक्तिक माहिती सहज उपलब्ध असल्याने फसवणूक करणारे ओळख चोरी किंवा ऑनलाइन फसवणूक करू शकतात. चेक-इन किंवा स्टेटस अपडेट्स फसवणूक करणाऱ्यांना तुमचा ठावठिकाणा, निवासी किंवा कामाच्या ठिकाणच्या पत्त्यांसह कळू देतात.

अलीकडचे तरुण सोशल मीडियावर सतत काहीना काही अपडेट देत असतात. परंतु जे सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात त्यांनी देखील सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण यामुळे लोकांना तुमच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते. फोटो किंवा व्हिडीओ-शेअरिंग साइट्सचा वापर केल्यानं व्यक्ती, त्याचं कुटुंब, मित्र याबद्दल बरीच माहिती मिळते, हॅकर्सना मिळते आणि त्यामुळं फसवणूक करणाऱ्यांना तुमचा पासवर्ड हॅक करण्यास सोपं जातं.

फ्रॉस्ट अँड सुलिव्हनचे संचालक (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान) बेनॉय सीएस म्हणाले, "फसवणूक करणारे तुमचा पासवर्ड डीकोड करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा माहितीचा वापर करतात." उदाहरणार्थ, हे तुमच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याचं नाव आणि काही संख्या यांचे संयोजन असू शकते.'

अधिकृत संप्रेषणाच्या नावाखाली बनावट ईमेल, एसएमएस किंवा कॉलद्वारे ग्राहकांकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचे सर्वात सामान्य मार्ग आहेत. फसवणूक करणाऱ्यांना ही माहिती मिळाल्यावर ते पैसे उकळण्यासाठी त्या व्यक्तीची ओळख वापरतात, जसे नेहलच्या बाबतीत घडलं. याशिवाय ते या व्यक्तीच्या नावावर क्रेडिट कार्डही घेऊ शकतात.

हेही वाचा: WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिन असाल तर 'या' 5 चुका करू नका, नाहीतर खावी लागेल जेलची हवा

तुम्ही तुमच्या पोस्ट फक्त जवळच्या मित्रांपर्यंत मर्यादित ठेवणं आणि गोपनीयता सेटिंग्ज नियमितपणे तपासणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तक्रारी नोंदवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्यास, साइटची वास्तविकता जाणून घेण्यासाठी पृष्ठाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात निळ्या रंगाची टिक तपासा. तुमचा एटीएम पिन आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल फोनवर कधीही ठेवू नका.

First published:

Tags: Digital prime time, Social media