स्वस्तात मस्त! सर्वात लहान स्मार्टफोन लाँच, 7 दिवस बॅटरी बॅकअपसह 14 खास फीचर्स

स्वस्तात मस्त! सर्वात लहान स्मार्टफोन लाँच, 7 दिवस बॅटरी बॅकअपसह 14 खास फीचर्स

जगातला सर्वात लहान आकर असलेल्या या फोनमध्ये 3जी टेक्नॉलॉजीसह ड्युअल कॅमेरा आणि इतर खास फीचर्स आहेत.

  • Share this:

World's smallest smartphone युके मधील Zini Mobiles या कंपनीने जगातील सर्वात लहान Zanco tiny t2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 3जी टेक्नॉलॉजी असलेल्या या फोनचा आकार अंगठ्याएवढा आहे. कंपनीने याआधी Zanco tiny t1 फोन लाँच केला होता. त्याचं अपग्रेड व्हर्जन नवा फोन आहे. यामध्ये कॅमेरासुद्धा असणार आहे. या फोनचे वजन फक्त 31 ग्रॅम असून 3जी डिव्हाइसमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. तसेच SOS मेसेजची सुविधाही आहे.

सध्या हा फोन फक्त युएस मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. युजर्सना हा फोन वेबसाइटवरून बूक करता येणार आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. मल्टिपल फीचर्स असलेल्या या फोनमध्ये कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग, MP3 आणि MP4 प्लेबॅक, गेम्स, कॅलेंडर ही फीचर्स आहेत. कॅलेंडर आणि अलार्म क्लॉकचा पर्यायही देण्यात आला आहे. याशिवाय एफएम रेडिओसुद्धा वापरता येणार आहे.

फोनमध्ये कॉलिंग, टेक्स्ट मेसेजची सुविधाही असेल. मेमरीच्या बाबतीत सांगायचे तर त्यात 32 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येते. यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

एवढ्याशा फोनमध्ये बिल्ट इन कॅमेराही आहे. फोटो क्लिक केल्यानंतर एसडी कार्डवरून फोटो दुसऱ्या फोनमध्ये पाठवता येतात. या फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 7 दिवस टिकेल असा दावा करण्यात आला आहे.

किंमतीच्या बाबतीतही हा फोन स्वस्त आहे. सुपर अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये हा फोन 4 हजार 200 रुपयांपर्यंत खरेदी करता येतो. सध्या अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये ही किंमत 4 हजार 900 रुपये असून किकस्टार्टर स्पेशल पॅक 5 हजार 600 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

jioची नवीन वर्षात खास भेट, 98 ते 2020 रुपयांपर्यंत बेस्ट प्लान

वाचा : 149 रुपयांचा Plan, vodafone, airtel, Reliance Jio पैकी कोणता आहे बेस्ट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: smartphone
First Published: Jan 13, 2020 09:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading