मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जगातली सगळ्यात शांत खोली; हृदयाची धडधड आणि हाडांचा आवाजही स्पष्ट ऐकू येतो!

जगातली सगळ्यात शांत खोली; हृदयाची धडधड आणि हाडांचा आवाजही स्पष्ट ऐकू येतो!

जगातल्या या सगळ्यात शांत रूममध्ये तुम्ही हालचाल केल्यानंतर तुमच्या हाडांच्या घर्षणाचा आवाज, हृदयाची धडधड आणि अगदी तुमच्या रक्ताभिसरणावेळी वाहणाऱ्या रक्ताचा आवाजही (Most silent room) तुम्ही ऐकू शकता.

जगातल्या या सगळ्यात शांत रूममध्ये तुम्ही हालचाल केल्यानंतर तुमच्या हाडांच्या घर्षणाचा आवाज, हृदयाची धडधड आणि अगदी तुमच्या रक्ताभिसरणावेळी वाहणाऱ्या रक्ताचा आवाजही (Most silent room) तुम्ही ऐकू शकता.

जगातल्या या सगळ्यात शांत रूममध्ये तुम्ही हालचाल केल्यानंतर तुमच्या हाडांच्या घर्षणाचा आवाज, हृदयाची धडधड आणि अगदी तुमच्या रक्ताभिसरणावेळी वाहणाऱ्या रक्ताचा आवाजही (Most silent room) तुम्ही ऐकू शकता.

    मुंबई, 9 सप्टेंबर : सध्या वर्क फ्रॉम होममुळे बरेच जण घरातून काम करत आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की घरातून काम करताना येणारा सर्वांत मोठा अडथळा म्हणजे गोंगाट. महत्त्वाचं काम किंवा मीटिंग सुरू असताना नेमका मागे गोंगाट होतो आणि सगळ्या कामाचा विचका होतो. अशा वेळी आपल्याला असं वाटतं, की एखादी शांत खोली (World’s most silent room) हवी होती, जिथून आपण शांततेत काम केलं असतं. खरंच जिथे बाहेरचा काहीच आवाज येत नाही, अशा खोलीमध्ये काम करणं शक्य आहे? मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये (Microsoft office silent room) अशीच एक खोली आहे, जिला जगातली सर्वांत शांत खोली असं मानलं जातं; मात्र या खोलीमध्येही तुम्हाला काम करता येईल याची शक्यता अगदीच कमी आहे.

    ही खोली अशा प्रकारे बनवण्यात आली आहे, की बाहेरचा कसलाच आवाज आतमध्ये येत नाही. आतमध्ये अगदी नीरव शांतता असल्यामुळे तुम्ही चक्क तुमच्या हृदयाचे ठोकेही (A room where you can listen your heartbeats) ऐकू शकता. एवढंच नाही, तर तुम्ही हालचाल केल्यानंतर तुमच्या हाडांच्या घर्षणाचा आवाज आणि अगदी तुमच्या रक्ताभिसरणावेळी वाहणाऱ्या रक्ताचा आवाजही (Most silent room) तुम्ही ऐकू शकता. यामुळेच, भयानक शांतता असूनही या खोलीमध्ये तुम्ही काम करू शकत नाही.

    अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीचं मुख्यालय आहे. या ठिकाणी ही ‘अनएकोइक रुम’ (Anechoic room) तयार करण्यात आली आहे. या रूममध्ये बाहेरचा आवाज जात नाही. तसंच, आतमध्येही आवाज तयार होत नाही. या रूममध्ये दुसरा आवाज उपलब्धच नसल्यामुळे, तुमची अगदी बारीक हालचालही मोठ्या प्रमाणात आवाज (Anechoic chamber) तयार करते. तुम्ही अगदी मान फिरवली किंवा हात हलवला, तरी सिनेमात स्लो मोशनमध्ये दाखवतात त्याप्रमाणे आवाज येऊ शकतो. एवढंच काय, तर तुम्ही अगदीच हालचाल न करता स्तब्ध राहिलात, तरी तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाजही तुम्हाला स्पष्ट ऐकू येतो.

    ही खोली (Anechoic room) डिझाइन करणारे हुंडाराज गोपाल यांनी सांगितलं, की या खोलीत येणाऱ्या व्यक्तीला आपण बहिरं झाल्यासारखं वाटतं. यासोबतच एक विचित्र अशी जाणीव त्या व्यक्तीला होत राहते, जी ती सांगू शकत नाही. आपल्या कानांना नेहमीच काही ना काही आवाज ऐकण्याची सवय असते. त्यामुळे कानांच्या पडद्यांवर कायम हवेचा दाब असतो. या खोलीमध्ये हवेचा हा दाब नाहीसा होतो. त्यामुळे मग आपल्याला बहिरं झाल्यासारखं वाटतं.

    ही रूम तयार करण्यासाठी काँक्रीट आणि स्टीलचे सहा लेयर्स वापरण्यात आले आहेत. तसंच याचा आकार कांद्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. याचं डिझाइन तयार करणं, प्लॅनिंग करणं आणि रूम तयार करणं या सगळ्या प्रक्रियेला दीड वर्षाचा कालावधी लागला होता. सध्या ही रूम जगातली सर्वांत शांत खोली (World’s most quiet room) म्हणून प्रसिद्ध आहे. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्येही या रूमचा समावेश करण्यात आला आहे.

    First published: