नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: शॉर्ट व्हिडीओ शेअरिंगसाठी प्रसिद्ध असणारं प्रसिद्ध चिनी अॅप टिकटॉक (TikTok) आता जगातील सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलेलं सोशल मीडिया अॅप ठरलं आहे. टिकटॉकने फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपला (WhatsApp) मागे टाकलं आहे. निक्केई एशिया (Nikkei Asia) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार, 2020 मध्ये डाउनलोड्स संदर्भात एक ग्लोबल सर्व्हेमध्ये टिकटॉक सोशल मीडिया प्रोव्हायडर्सच्या यादीत सर्वोच्च स्तरावर आहे. 2018 मध्ये हा अभ्यासाची सुरुवात झाली होती, त्यानंतर पहिल्यांदाच टिकटॉक नंबर 1 वर आहे. 2020 मध्ये जगभरात सर्वात जास्त डाऊनलोडेड टॉप 10 अॅप्समध्ये सर्वाधिक म्हणजेच 7 अॅप अमेरिकन संस्थांनी विकसीत केलेली आहेत.
यापैकी चार अॅप्स- फेसबुक, व्हॉट्सअॅप , इन्स्टाग्रॅम आणि फेसबुक मेसेंजर यांचा मालकी हक्क एका कंपनीकडे आहे, जे पहिल्या पाचमध्ये आहेत. रिपोर्ट नुसार, आशियामध्ये (चीन वगळता) सर्वाधिक वेळा डाऊनलोडेड अॅप फेसबुक आहे तर टिकटॉक दुसऱ्या स्थानावर आहे.
हे वाचा-BSNL ग्राहकांना झटका! या 7 प्लॅनमध्ये कंपनीने कमी केले बेनिफिट्स, वाचा सविस्तर
मेसेजिंग अॅप टेलिग्राम देखील कोरोना काळात मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात आले आहे. हे अॅप डाऊनलोडिंगमध्ये 2019 मध्ये आशियात पंधराव्या स्थानावर होतं, 2020 मध्ये टेलिग्राम सातव्या क्रमांकावर रँक करत आहे. तर ग्लोबल रँकिंगमध्ये टेलिग्राम एक पायरी वर चढत सातव्या स्थानावर आहे.
Likee हे टिकटॉकप्रमाणे शॉर्ट व्हिडीओसाठी प्रसिद्ध असणारं अॅप लोकप्रियता मिळवत आहे. या अॅपमध्ये बनणारे व्हिडीओ अनेक कंपन्या मार्केटिंगसाठी वापरत आहेत. जगभरात डाऊनलोड झालेल्या टॉप 10 अॅपच्या यादीत हे आठव्या क्रमांकावर आहे.
हे वाचा-व्हॉट्सअॅपवर लवकरच नवं फीचर, आता फोटो सुद्धा एडिट करून पाठवता येणार!
भारतात बॅन आहे टिकटॉक
भारतात टिकटॉक बॅन आहे, मात्र टिकटॉकची लोकप्रियता अधिक आहे. या अॅपने इन्स्टाग्रामला देखील लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकलं आहे. देशातील दुसरा मोठा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून टिकटॉकने स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान गोपनीयता आणि डेटा सुरक्षिततेचा हवाला देत भारत सरकारने 200 हून अधिक चिनी अॅप बॅन केली होती, त्यात टिकटॉकचाही समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.