मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जगातला पहिला 18GB RAM असणारा Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

जगातला पहिला 18GB RAM असणारा Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

12 GB रॅम असलेले अनेक फोन बाजारात आहेत, मात्र आता 18 GB रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 18 GB रॅम असलेला हा जगातला पहिला फोन असल्याचं बोललं जात आहे.

12 GB रॅम असलेले अनेक फोन बाजारात आहेत, मात्र आता 18 GB रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 18 GB रॅम असलेला हा जगातला पहिला फोन असल्याचं बोललं जात आहे.

12 GB रॅम असलेले अनेक फोन बाजारात आहेत, मात्र आता 18 GB रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 18 GB रॅम असलेला हा जगातला पहिला फोन असल्याचं बोललं जात आहे.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : स्मार्टफोन ( smartphone) खरेदी करताना त्यातील रॅम ( RAM) किती GB आहे, याला फार महत्त्व असतं. कारण त्यावरच फोनचा परफॉर्मन्स आणि स्पीड अवलंबून असतो. फोनचा रॅम आणि स्टोरेज ( RAM and storage) याची माहिती घेऊनच फोन खरेदी केला जातो. हीच गोष्ट पाहून फोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता तब्बल 18 GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

स्मार्टफोनच्या स्पीडसाठी प्रोसेसर ( processor), तसंच रॅमचं महत्त्व नाकारता येत नाही. जितका रॅम जास्त असेल तितकी फोनची कार्यक्षमता चांगली असते. 12 GB रॅम असलेले अनेक फोन बाजारात आहेत, मात्र आता 18 GB रॅम असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 18 GB रॅम असलेला हा जगातला पहिला फोन असल्याचं बोललं जात आहे.

नवीन फोन घ्यायचाय? 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील हे जबरदस्त Smartphone

एक टीबी इंटर्नल स्टोरेज -

ZTE या चिनी स्मार्टफोन कंपनीची Axon 30 सीरिज पॉप्युलर आहे. या कंपनीने त्यांच्या ZTE Axon 30 Ultra या फ्लॅगशिप स्मार्टफोनची Aerospace Edition लाँच केली आहे. हे जगातलं पहिलं असं डिव्हाइस आहे, ज्यामध्ये 18 GB रॅम आणि 1 टीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सेल कॅमेरा आणि एक टेलीफोटो लेन्स आहे.

या स्मार्टफोनमध्ये 4600 mAh बॅटरी आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची किंमत 6998 युआन म्हणजेच सुमारे 82,068 रुपये आहे. याशिवाय ZTE Axon 30 Ultra Vanilla Edition मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे, त्याची किंमत 4698 युआन म्हणजे सुमारे 55 हजार रुपये आहे. या सीरिजचे फोन कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केले होते.

Samsung चं जबरदस्त चार्जर, एकाच वेळी काही मिनिटांत चार्ज करणार तीन Smartphone

64 मेगापिक्सेल कॅमेरा -

ZTE Axon 30 Ultra च्या Aerospace Edition फोनमध्ये 6.67 इंची फुल एचडी प्लस कर्व्ह्ड अमोलेड डिस्प्ले आहे. तो एचडीआर 10 प्लसला सपोर्ट करेल. यात 144hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला असून, तो गेमिंग आणि स्क्रोलिंग सुधारतो. या ZTE मोबाइलमध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट वापरण्यात आला आहे. तो 18 GB रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह येतो.

6000 रुपये स्वस्त मिळतोय Samsung चा 64MP कॅमेरा असणारा 5G फोन, पाहा फीचर्स-किंमत

या फोनला क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यात 64 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासह एक 8 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सदेखील आहे. याशिवाय, इतर लेन्सदेखील आहेत. या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सर्वांत जास्त रॅम असणारा फोन खरेदी करण्याची इच्छा असेल, तर अशा ग्राहकांसाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

First published:

Tags: Smartphone, Tech news