World Photography Day : या Apps शिवाय तुमची फोटोग्राफी पूर्ण होऊ शकत नाही

मोबाईल किंवा कॅमेऱ्यावर फोटो काढल्यानंतर ते सोशल मीडियावर किंवा इतरत्र शेअर करताना एडिट करण्यासाठी अनेक अँड्रॉइड अॅप्सचा वापर केला जातो.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 06:31 PM IST

World Photography Day : या Apps शिवाय तुमची फोटोग्राफी पूर्ण होऊ शकत नाही

एक फोटो हजार शब्दांत जे मांडता येत नाही ते व्यक्त करतो. World Photography Day च्या निमित्तानं अनेकांनी फोटोच्या माध्यमातून त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत. पहिल्या कॅमेऱ्याचा शोध लागल्यापासून आतापर्यंत या तंत्रज्ञात अनेक बदल होत गेले. आता सर्वांच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये चांगल्या दर्जाचा कॅमेरा आला.

मोबाईल किंवा कॅमेऱ्यावर फोटो काढले तरी आपल्याला हवा तसा फोटो दिसत नाही. फोटोंना एडीट केलं तर ते आणखी चांगले दिसू शकतात. यासाठी मोबाईलवर अनेक एडिटिंग अॅप्स आहेत. त्यातील काही अॅप्स ही वापरण्यासाठी सोपी आणि एडींटिंगसाठीसुद्धा चांगली आहेत.

Pics Art Photo Studio हे अँड्रॉइड अॅप फोटो एडिटिंगसाठी सर्वाधिक वापरलं जातं. यामध्ये फिल्टर्स, शेप, कोलाज, फ्रेम या ऑप्शनमुळं फोटो हवा तसा एडिट करता येतो. यात सहजपणे इफेक्ट देता येतात. अॅप वापरण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीत.

Pixlr या अॅपमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली असून वेगवेगळ्या पद्धतीनं फोटो एडिट करता येतो. यात फोटो एडिटिंग सहज आणि सोप्या पद्धतीनं करता येतं. बेसिक एडिट, रिसाइज, रोटेट किंवा क्रॉप करण्यासाठी हे अॅप बेस्ट आहे.

Adobe Photoshop Express कम्प्युटरवर अॅडोब फोटोशॉप हे सॉफ्टवेअर फोटो एडिटिंगसाठी वापरलं जातं. ते मोबाईवरसुद्धा उपलब्ध आहे. अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज फोनच्या प्ले स्टोअरवरून हे डाऊनलोड करता येतं. या अॅपमध्ये इतर अॅपपेक्षा जास्त ऑप्शन आहेत. ज्यामुळं वेगवेगळे इफेक्ट देऊन फोटो एडिट करता येतो.

Loading...

Snapseed मोबाईलवर फोटो एडिट करण्यासाठी हे अॅपसुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. या अॅपवर ऑफलाईन फोटो एडीट करता येतात. एकदा डाऊनलोड केल्यानंतर फोटो एडीटसाठी इंटरनेटची गरज पडत नाही. फोटोचं कलर करेक्शन याशिवाय अनेक इफेक्ट यामध्ये देता येतात. यामध्ये बरेच टूल्स  असून त्याचा सहज वापर करता येतो.

Photo Editor Pro यात स्टायलिश इफेक्ट, फिल्टर्स, ग्रिड आणि ड्रॉ टूल्स आहेत. फोटो एडिटर प्रो या अॅपवर एडिट केलेला फोटो थेट इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप, फेसबुकवर शेअर करता येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...