मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ब्रेन ट्युमर शोधून त्याचा खात्माही करणार; अपघाताप्रमाणे आता भयंकर आजारापासून वाचवणार हेल्मेट

ब्रेन ट्युमर शोधून त्याचा खात्माही करणार; अपघाताप्रमाणे आता भयंकर आजारापासून वाचवणार हेल्मेट

वैज्ञानिकांनी एक असं मॅग्नेटिक हेल्मेट (magnetic helmet) तयार केलं आहे, ज्याच्या मदतीने ट्युमर डिटेक्ट करण्यासह तो संपुष्ठातही आणला जाऊ शकतो.

वैज्ञानिकांनी एक असं मॅग्नेटिक हेल्मेट (magnetic helmet) तयार केलं आहे, ज्याच्या मदतीने ट्युमर डिटेक्ट करण्यासह तो संपुष्ठातही आणला जाऊ शकतो.

वैज्ञानिकांनी एक असं मॅग्नेटिक हेल्मेट (magnetic helmet) तयार केलं आहे, ज्याच्या मदतीने ट्युमर डिटेक्ट करण्यासह तो संपुष्ठातही आणला जाऊ शकतो.

नवी दिल्ली, 28 जुलै : टेक्नोलॉजीच्या जगात दररोज काही ना काही नवं तंत्रज्ञान विकसित होत आहे. आता टेक्नोलॉजीच्या जोरावर आपण आधीच्या तुलनेत सुरक्षित आणि आजारांशी लढण्यात पुढे आहोत. ब्रेन ट्युमर, कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये ओळखणं कठीण ठरतं. परंतु याआधी अशा काही टेस्ट झाल्या आहेत, ज्याद्वारे हेल्मेट (Helmet) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने ब्रेन ट्युमरची ओळख होणं सोपं झालं आहे. आता या पुढे जात वैज्ञानिकांनी एक असं मॅग्नेटिक हेल्मेट (magnetic helmet) तयार केलं आहे, ज्याच्या मदतीने ट्युमर डिटेक्ट करण्यासह तो संपुष्ठातही आणला जाऊ शकतो.

यशस्वी चाचणी -

न्यूरोलॉजीच्या एका लेटेस्ट चाचणीत वैज्ञानिकांनी अशा हेल्मेटचा शोध लावला आहे, जो मेंदूच्या ट्यूमरशी लढण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रभावी आहे. वैज्ञानिकांनी या हेल्मेटमध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डच्या मदतीने एका 53 वर्षीय रुग्णाच्या डेड ट्युमरचा जवळपास एक तृतियांश भाग काढून टाकला आहे. या रुग्णाचा दुसऱ्याच कारणामुळे मृत्यू झाला होता. परंतु शवविच्छेदनामध्ये रुग्णाचा ट्युमर अतिशय कमी वेळेत जवळपास एक तृतियांश गायब झाला असल्याचं सांगण्यात आलं. ही चाचणी जगातील पहिली ब्रेन कॅन्सरच्या धोकादायक स्टेज Glioblastoma च्या नॉन इनवेसिव थेरेपी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Microsoft AI Model: मायक्रोसॉफ्टची कमाल; चक्रीवादळ, महापुराच्या धोक्याचा देणार पूर्वानुमान

हे हेल्मेट कसं काम करतं?

या हेल्मेटमध्ये तीन सतत फिरणारे मॅग्नेटिक, ज्याला मायक्रोप्रोसेसर बेस्ड इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरद्वारे जोडण्यात आलं आहे. हे रिचार्ज होणाऱ्या बॅटरीसह जोडण्यात आलं आहे. या थेरेपीमध्ये त्या रुग्णाने हे हेल्मेट 5 आठवड्यांपर्यंत रुग्णालयात घातलं, त्यानंतर काही दिवस घरी हे हेल्मेट घातलं. त्यानंतर या हेल्मेटचा डेटा रीड केला गेला आणि सांगण्यात आलं, की दररोज कमीत-कमी 6 तास हे हेल्मेट रुग्णाला घालावं लागेल. हे हेल्मेट घातल्यानंतर रुग्णाच्या ट्युमरचा आकार जवळपास एक तृतियांश कमी झाला होता.

Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च करतात पुरुष; रिसर्चमधून हैराण करणारा खुलासा

होस्टन मेथोडिस्ट न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटचे डायरेक्टर डेविड बस्किन यांनी सांगितलं, की या हेल्मेटच्या मदतीने भविष्यात ब्रेन कॅन्सरचा इलाज कोणत्याही नुकसानदायक प्रोसेसशिवायच शक्य होऊ शकेल.

First published:
top videos

    Tags: Tech news