World Emoji Day 2019 : सोशल मीडियावर एकूण किती Emoji वापरले जातात माहीत आहे?

World Emoji Day 2019 : सोशल मीडियावर एकूण किती Emoji वापरले जातात माहीत आहे?

आजच्याच दिवशी इमोजीचा वापर सुरू झाला होता. दरवर्षी आज म्हणजे 17 जुलैला जागतिक इमोजी दिवस साजरा केला जातो. World Emoji Day 2019

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : सोशल मीडियाचा एक अविभाज्य भाग म्हणजे इमोजी. ऑनलाईन चॅटिंग करताना, मेसेज पाठवताना हमखास इमोजीचा आधार घेतला जातो. आपले हावभाव आणि मूड व्यक्त करण्यासाठी इमोजी मदत करतात. इमोजी म्हणजेच इमोटिकॉन्स रोजच्या लेखी संवादाचा भाग होऊन किती वर्षं झाली माहिती आहे का?  2014 ला पहिला इमोजी दिवस साजरा करण्यात आला. Whatsapp, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर या माध्यमातून चॅटिंग करताना किती इमोजी वापरले जातात माहिती आहे का? मार्च 2019 पर्यंतच्या आकड्यानुसार 3,019 emojis वापरली जात आहेत.

आपल्याला इमोजीची इतकी सवय झाली आहे की,  फक्त मेसेज पाठवताना तो इमोजीविना पाठवला तर अपुरा असल्यासारखा वाटतं. पण, तुम्हाला हे माहीत आहे का, इमोजीचा पहिल्यांदा वापर कधी झाला? आजच्याच दिवशी म्हणजे 17 जुलैला जागतिक इमोजी दिवस साजरा केला जातो. 2014 ला पहिला इमोजी दिवस साजरा करण्यात आला. सन 1990 मध्ये शिगेताका कुरीता यांनी इमोजी तयार केला. ऑफिशियल यूनिकोड स्टँडर्ड लिस्टच्या माहितीनुसार 2017 सालापर्यंत 2666 इतके इमोजी तयार करण्यात आले.

FaceApp वापरणाऱ्यांनो सावधान! तुमची प्रायव्हसी धोक्यात

यूनिकोड कन्सोर्शियम हे इमोजी कशी तयार केली पाहिजे हे ठरवतं. मात्र गूगल आणि अ‍ॅपल या कंपन्या स्वतः इमोजी तयार करतात. जागतिक इमोजी दिवसाची सुरुवात जेरेमी बर्ग यांनी केली आणि ते स्वतः यूनिकोड कमेटीचे सदस्यही आहेत.

WhatsApp वर सुरक्षित नाहीत मीडिया फाइल्स, सेटिंगमध्ये करा 'हे' बदल!

इमोजी कुणी आणि कसे तयार करावेत यावर बंधन नाही. पण ते वापरात यावेत यासाठी युनिकोड कन्सोर्शियम ही संघटना काम करते. नव्या इमोजीसाठी या संघटनेकडे प्रस्ताव ठेवता येतो.  दरवर्षी नव्या इमोजीसाठी हजारोंच्या संख्येने प्रस्ताव येतात.

अशी झाली सुरुवात

1990 दशकाच्या शेवटी इमोजीचा वापर चालू झाला. सर्वात आधी अ‍ॅपल कंपनीने आयफोनच्या किबोर्डमध्ये त्याचा समावेश केला. आजच्या दिवशी म्हणजे 17 जुलैला इमोजी दिवस म्हणून मान्यता 2014 मध्ये देण्यात आली. जेरेमी बर्ग इमोजीवर आधारित सर्च इंजिनवर Emojipedia चालवतात. या सर्च इंजिनवर तुम्ही की वर्ड ऐवजी इमोजी टाकून सर्च करू शकता.

सगळ्यात लोकप्रिय असलेल्या 9 Emoji

Face With Tears of Joy

❤️ Red Heart

Smiling Face With Heart-Eyes

Thinking Face

Fire

Smiling Face With Smiling Eyes

Face Blowing a Kiss

Thumbs Up

Smiling Face With Hearts

VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप

First published: July 17, 2019, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading