Google pay मुळे महिलेला दणका, बिअर खरेदी करताना 87 हजारांचा फटका

Google pay मुळे महिलेला दणका, बिअर खरेदी करताना 87 हजारांचा फटका

Google Pay वरून बिअर खरेदी करणं मुंबईतील महिलेला महागात पडलं आहे. तिची फसवणूक झाली असून खात्यावरून 87 हजार रुपये काढले.

  • Share this:

मुंबई: UPI ट्रान्झॅक्शनचा वापर करणं एका महिलेला महागात पडलं आहे. बिअर खरेदी करताना खात्यावरून 87 हजार रुपये काढले गेले. मुंबईत पवई भागातील एका वाइन शॉपमध्ये फोन केला. त्यावेळी दुकानदाराने फोनवरून गुगल पेवरून 420 रुपये पाठवण्यास सांगितले. त्यावेळी UPI ID शेअर करण्यास सांगितलं.

महिलेनं तिचा आयडी शेअर करताच तिला पेमेंट रिक्वेस्ट मिळाली. ती स्वीकारताच खात्यावरून 29 हजार एक रुपये डेबिट झाले. तेव्हा महिलेनं वाइन शॉपमध्ये पुन्हा फोन लावून विचारणा केली. यावर दुकानदाराने माफी मागून चुक झाल्याचं म्हटलं. त्यानंतर कॉल बंद करताच तिच्या खात्यावरून पुन्हा 58 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला.

याप्रकऱणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेने पैसे खात्यावरून निघाल्याचे समजताच दुकानाच्या पत्त्यावर पोहचली. दुकानदाराने सांगितलं की, ज्या नंबरवर महिलेनं फोन केला तो त्यांच्या शॉपचा नंबर नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गुगलने व्यवहार सुरक्षित कऱण्यासाठी अॅपवर नोटीफिकेशन आणि एसएमएस पाठवतं. जर रिक्वेस्ट स्वीकारली तर बँक खात्यातून पैसे डेबिट होतात. मात्र, याचाच फायदा घेत फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळं ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे.

CamScanner मध्ये आला धोकादायक व्हायरस; तुमच्या मोबाईलवरून तातडीने करा Delete

दीड जीबी पुरत नाही तर 96 रुपयांमध्ये मिळवा दररोज 10 जीबी डेटा, जाणून घ्या पूर्ण ऑफर!

VIDEO : VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक

First Published: Aug 30, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading