Home /News /technology /

विना Mobile Number असं डाउनलोड करा Aadhaar Card, जाणून घ्या सोपी पद्धत

विना Mobile Number असं डाउनलोड करा Aadhaar Card, जाणून घ्या सोपी पद्धत

रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवायच आधार कार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सर्व सरकारी कामांसह अनेक खासगी कामांसाठीही आधार कार्ड द्यावं लागतं. मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला असेल, तुमच्याकडे रजिस्ट्रेशन मोबाइल नंबर नसेल तरी आधार कार्ड डाउनलोड करता येतं. रजिस्टर्ड मोबाइल नंबरशिवायच आधार कार्ड डाउनलोड करू शकता. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ज्या लोकांचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये रजिस्टर्ड नाही, अशांसाठी UIDAI ने महत्त्वाची घोषणा केली आहे. याआधी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर असणं अनिवार्य होतं. परंतु आता याची गरज नसून मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यासही आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकतं.

  कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या Aadhaar Card चा वापर तर करत नाही ना? असं ओळखा

  विना रजिस्टर्ड मोबाइल नंबर असं डाउनलोड करा आधार कार्ड - - सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. इथे My Aadhaar सेक्शनवर क्लिक करा. - त्यानंतर Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा. - त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. - इथे आधार नंबर ऐवजी 16 अंकी वर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर अर्थात VID चा वापर करावा लागेल आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल. - त्यानंतर My Mobile Number Is Not Registred वर क्लिक करावं लागेल. - इथे दुसरा नंबर टाकावा लागेल. - त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. OTP टाकून एंटर करा. - Terms and Condition वर क्लिक करुन सब्मिटवर क्लिक करा. - आता आधार लेटरचा Preview मिळेल. - त्यानंतर पेमेंट करावं लागेल. त्यासाठी Make Payment ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आधार कार्ड डाउनलोड करुन त्याची प्रिंटआउट काढू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card, M aadhar card

  पुढील बातम्या