मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /50 MP कॅमेरासह Google Pixel 6 लाँच, पाहा नव्या फोनची खास फीचर्ससह काय आहे किंमत

50 MP कॅमेरासह Google Pixel 6 लाँच, पाहा नव्या फोनची खास फीचर्ससह काय आहे किंमत

Google ने Pixel 6 सीरिज लाँच केली आहे. नव्या Google Pixel 6 सह Google Pixel 6 Pro देखील लाँच झाला आहे.

Google ने Pixel 6 सीरिज लाँच केली आहे. नव्या Google Pixel 6 सह Google Pixel 6 Pro देखील लाँच झाला आहे.

Google ने Pixel 6 सीरिज लाँच केली आहे. नव्या Google Pixel 6 सह Google Pixel 6 Pro देखील लाँच झाला आहे.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : Google ने Pixel 6 सीरिज लाँच केली आहे. नव्या Google Pixel 6 सह Google Pixel 6 Pro देखील लाँच झाला आहे. नवी Google Pixel 6 सीरिज भारतात आधीपासून असलेल्या वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो, सॅमसंग गॅलेक्सी S21 सीरीज आणि इतर अँड्रॉईड फ्लॅगशिपला टक्कर देईल. Google Pixel 6 दोन स्टोरेज वेरिएंट 8GB + 128GB आणि 8GB + 256GB सह येतो.

याच्या बेस 128GB वेरिएंटची किंमत 599 डॉलर्स, जवळपास 45,900 रुपये ठेवण्यात आली आहे. Pixel 6 तीन रंगात Kinda कोरल, Sorta सीफोम आणि स्टोरी ब्लॅकमध्ये आहे.

Google Pixel 6 Pro तीन वेरिएंटमध्ये येतो. याच्या 12GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 898डॉलर्स जवळपास 67,500 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय हा फोन 12GB + 256GB आणि 12GB + 512GB ऑप्शनमध्येही येतो. हा फोन Cloudy व्हाइट, Sorta सनी आणि Stormy ब्लॅक कलरमध्ये येतो.

या दिवाळीत OnePlus Nord 2 5G आणि Nord CE 5G वर मिळवा जबरदस्त डिस्काउंट!

Google Pixel 6  -

फोनला 6.4 इंची OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टम असून 5G फोन आहे. फोनमध्ये लाइव्ह ट्रान्सलेशन फीचरही आहे.

Pixel 6 फोनला बॅक पॅनलमध्ये डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे. हा वाइड सेन्सर असून चांगल्या क्वालिटी फोटोसह अधिक लाइट कॅप्चर करू शकतो. तसंच फोनला 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे.

ऑर्डर केलं एक आलं भलतंच! आता फक्त एक काम करा आणि Online Shopping मधील घोळ टाळा

Google Pixel 6 Pro -

Google Pixel 6 Pro ला 6.7 इंची डाइनॅमिक डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये टेंसर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

Google Pixel 6 Pro ला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. 2.5X अधिक लाइट कॅप्चर करू शकतो. सेकंडरी कॅमेरा 12 मेगापिक्सल असून तिसरा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. यात 20X सुपर रेज झूम सपोर्ट मिळेल.

First published:
top videos

    Tags: Google, Smartphone