हॉटस्पॉटचं इंटरनेट वापरणं होणार आणखी सोपं; बदलणार 'हे' नियम

दूरसंचार विभाग डिसेंबर अखरपर्यंत देशात 10 लाख ठिकाणी हॉटस्पॉट सुविधा उपलब्ध करून देणार

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 05:48 PM IST

हॉटस्पॉटचं इंटरनेट वापरणं होणार आणखी सोपं; बदलणार 'हे' नियम

नवी दिल्ली, 17 मे : इंटरनेट सेवा देणाऱ्या एखाद्या कंपनीचे तुम्ही ग्राहक नसलात तरी जून-19 पासून कोणत्याही टेलीकॉम कंपनीचं वाय-फाय हॉटस्पॉट तुम्ही कनेक्ट करू शकाल. गृह मंत्रालयाने वाय-फाय हॉट स्पॉटच्या इंटरपोर्टेबिलिटीला हिरवा झेंडा दाखवला असल्याची माहिती सीएनबीसी आवाज़ला सूत्रांनी दिली.

दूरसंचार विभाग लवकरच यासाठीच्या अटी आणि शर्तींमध्ये बदर करणार आहे. यामुळे टेलीकॉम कंपन्यांना ठिकठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट सुविधा लोकांना उपलब्ध करून देता येईल. एकट्या दूससंचार विभागाने डिसेंबर अखरपर्यंत देशात 10 लाख ठिकाणी हॉटस्पॉट सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे अन्य टेलीकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवरचं ओझं कमी होईल असं दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.


5000 रुपयांपेक्षाही स्वस्त असलेल्या 'या' स्मार्चफोनमध्ये मिळतील तुम्हाला iPhone सारखे फीचर्स


Loading...

वाय-फाय हॉट स्पॉट इंटरपोर्टेबिलिटीला मंजूरी

- गृह मंत्रालयाने अटी आणि शर्तींना दाखवला हिरवा झेंडा.

- दुसऱ्या नेटवर्कला कनेक्ट होताना पहिल्यावेळी ग्राहकांना स्वतःची पूर्ण माहिती द्यावी लागेल.

- सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अद्याप यास मंजूरी मिळालेली नाही.

- दूरसंचार विभाग करणार लायसन्समधील अटी आणि शर्तींमध्ये बदल, डाटा रोमिंगचासुद्धा यात अंतर्भाव करणार.

- यासाठीच्या नव्या अटी आणि शर्ती जून-19 पासून लागू होतील.

- कोणत्याही कंपनीच्या ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या वाय-फाय सुविधेचा लाभ घेता येईल.


'या' ऑनलाईन शॉपिंग साइटवर मिळत आहे अर्ध्या किमतीत स्मार्ट फोन


टेलिकॉम कंपन्या लागल्या कामाला -

टेलिकॉम कंपन्या आपल्या सब्सक्राइबर बेस आणि प्रॉफिट वाढविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, एअरटेल वाय-फाय झोन सर्व्हिसच्या माध्यमातून सब्सक्राइबर्स 500 ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट कनेक्ट करू शकतील. एअरटेल सबस्क्राइबर्ससाठी ही सेवा निःशुल्क असणार आहे.


सुरुवातील एअरटेल ही सेवा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी सुरू करेल. तुर्तास एअरटेलने आपली ही सेवा काही ठिकाणी उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. ज्या ठिकाणी ही सेवा सुरू आहे त्या ठिकाणांची महिती एअरटेलने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.


लिनोवोचा 'हा' फोल्डेबल स्क्रीन लॅपटॉप घडवणार क्रांती; 'ही' आहेत वैशिष्ट्य


वाय-फाय हॉट स्पॉट -


हॉटस्पॉट हे एक फिजिकल लोकेशन असतं ज्या ठिकाणी लोकांना इंटरनेट सर्विस प्रोव्हाइड (ISP) केली जाते. wireless local area network (WLAN) च्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या या सेवेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कॉफी शॉप, होटल, विमानतळ अशा सार्वजनिक ठिकाणी लागलेल्या राऊटरच्या माध्यमातून या सुविधेचा तुम्हाला उपयोग करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...