तुम्ही Social Media वर पोस्ट लाइक, शेअर का करता? वाचा काय आहे कारण

सोशल मीडियाचं व्यसन हे दारू आणि सिगारेट यापेक्षा वाईट आहे. यापासून सुटका करून घ्यायची असेल तर काय करायचं? जाणून घ्या.

  • Share this:

दिवसातून महत्वाच्या कामाव्यतिरिक्त सर्वाधिक वेळ हा बहुतांश सोशल मीडियावर जात आहे. जगात फिलिपाइन्समधील लोक सर्वात जास्त सोशल मीडियावर असतात. यामागे वैज्ञानिक कारण आहे. तुम्ही एखादी पोस्ट आवडली म्हणून लाइक, कमेंट करता पण ते कसं घडतं माहिती आहे का? जाणून घ्या...

सोशल मीडियावर दिवसभर स्क्रोल करत असतो. नोटिफिकेशन आलं की ते लगेच काय आहे या उत्सुकतेपोटी उघडून पाहतो. फेसबूक-ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे मेंदुतील रिवॉर्डिंग सेंटर अॅक्टिवेट होतं.

जगभरात प्रत्येक युजर सरासरी 135 मिनिटं म्हणजे जवळपास सव्वा दोन तास सोशल मीडियावर घालवतो. याचाच अर्थ लोकांचा दिवसातील 10 टक्के वेळ सोशल मीडियावर खर्ची पडतो.

मेंदुमध्ये असलेल्या डोपामाइनमुळे आनंदाची भावना निर्माण होते. याचा जबरदस्त प्रभाव पडतो. दारू आणि सिगारेटच्या व्यसनापेक्षा टि्वट करण्याचं व्यसनसुद्धा यातून निर्माण होतं. हे व्यसन महिलांमध्ये 60 टक्के तर पुरुषांमध्ये 56 टक्के इतकं आहे.

एखादी पोस्ट शेअर करण्यामागे 68 लोकांचा उद्देश ती माहिती इतरांना पोहचवणं असा असतो तर 78 टक्के लोक यासाठी शेअर करतात की इतरांसोबत कनेक्ट राहता यावं. सोशल मीडियावर असलेलं नातं टिकवण्यासाठी लाइक आणि शेअर केलं जातं.

सॅलफोर्ड युनिव्हर्सिटीनं केलेल्या संशोधनात 50 टक्के युजर्सनी सोशल मीडियामुळं जीवन उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं. मित्रांशी ऑनलाइन तुलना केल्यानं प्रतिष्ठेला ठेच लागते असं मत युजर्सनी व्यक्त केलं.

सोशल मीडियाचं हे व्यसन सोडवायचं असेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवलं पाहिजे. काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न आणि ज्या गोष्टींमुळं आपल्याला टेन्शन येतं त्याला अनफॉलो करा. तसेच सोशल मीडियापासून काही वेळ दूर राहणंसुद्धा चांगलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या