मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Oneplus Smartphones: वनप्लस मोबाईलला म्हटलं जातं सर्वोत्तम अँड्रॉइड फोन! काय आहे खासियत?

Oneplus Smartphones: वनप्लस मोबाईलला म्हटलं जातं सर्वोत्तम अँड्रॉइड फोन! काय आहे खासियत?

वनप्लस मोबाईलला म्हटलं जातं सर्वोत्तम अँड्रॉइड फोन! काय आहे खासियत?

वनप्लस मोबाईलला म्हटलं जातं सर्वोत्तम अँड्रॉइड फोन! काय आहे खासियत?

Oneplus Smartphones: जेव्हा अँड्रॉइड फोन्सची तुलना करण्याचा विचार येतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आठवतो तो वनप्लस स्मार्टफोन. वनप्लसचे स्मार्टफोन अँड्रॉईडमध्ये सर्वोत्तम मानले जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 5 सप्टेंबर: सध्या बाजारात अनेक मोबाईल कंपन्या अनेक दमदार स्मार्टफोन (best Smartphone) लाँच करत आहेत. जेव्हा आपण मोबाईल फोन्सबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक आयफोन (iPhones) आणि वनप्लस (OnePlus) या कंपन्यांच्या स्मार्टफोन शीर्षस्थानी असतात. दोन्ही फोन लोकांना खूप आवडतात. आयफोनमध्ये खरेदी करण्याच्या बाबतीत काही मर्यादा आहेत, त्यामुळं अनेक लोकांचा कल वनप्लस या Android मोबाईल फोनकडे असतो. बाजारात वनप्लस मोबाईल फोनला खूप मागणी आहे. याचं कारण म्हणजे स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये. कॅमेर्‍यांपासून स्टोरेजपर्यंत, OnePlus नं स्वतःला सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. चला तर मग जाणून घेऊया वनप्लस स्मार्टफोन लोकांना का आवडतो याबद्दल,

1. Performance-

OnePlus च्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर फोन बराच वेळ वापरूनही तो गरम होत नाही. तसेच त्याचं चार्जिंग देखील जलद होतं. चित्रपट पाहण्यापासून ते गेम खेळण्यापर्यंत, तुम्ही OnePlus वर सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता. स्क्रीनचा दर्जाही चांगला आहे.

2. Latest Features-

वनप्लस अशी कंपनी आहे, जी सतत अपडेट होत असते. फोनवर नवीन फीचर्स येत राहतात. नवीनतम OnePlus फोनमध्ये येत असलेल्या वैशिष्ट्यांप्रमाणे, ऑक्सिजन ओएस, जे गेमर्सना चांगला आणि सहज अनुभव देतात.

3. Top-Notch Camera-

OnePlus मोबाईल फोन त्याच्या कॅमेरासाठी खूप प्रसिद्ध आहे. फोनच्या कॅमेराची गुणवत्ता चांगली आहे. OnePlus मोबाईलमध्ये मुख्य आणि सेल्फी कॅमेरे खूपच चांगले आहेत. या हँडसेटमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश, HD, 4K रेकॉर्डिंग आणि gyro-EIS (स्टेबिलायझेशन) सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने उत्तम फोटो काढता येतात.

4. Flamboyant Sound-

ज्यांना संगीत ऐकायला आवडतं त्यांच्यासाठी हा फोन सर्वोत्तम मानला जातो. OnePlus 8T ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह येतो आणि या स्पीकर्समध्ये नॉईज कॅन्सलेशन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट आहे. ब्लूटूथच्या साहाय्यानं कोणतेही बाह्य उपकरण कनेक्ट करूनही तुम्ही या मोबाइलवरून गाणी ऐकू शकता.

हेही वाचा- Nokiaची लॅपटॉप मार्केटमध्ये एन्ट्री; काय असेल वजनाने हलके आणि स्टायलिश लॅपटॉपची खासियत?

आता वनप्लसच्या काही प्रगत वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया:

1. Gaming Do Not Disturb-

OnePlus 5T मध्ये हे एक नवीन वैशिष्ट्य जोडलं गेले आहे. या गेमिंग डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये तुम्ही नोटिफिकेशन्स ब्लॉक करू शकता. गेमिंग डू नॉट डिस्टर्ब मोड चालू असताना जेव्हा जेव्हा कॉल येतो, तेव्हा गेम खेळत असताना तो आपोआप स्पीकरवर येतो.

2. OTG स्टोरेज-

हे स्टोरेज फंक्शन तुमच्या डिव्‍हाइसमध्‍ये इनएक्टिव असल्‍यानंतर 10 मिनिटांनंतर आपोआप बंद होते.

3. पॉकेट मोड-

तुमच्या फोनमध्ये पॉकेट मोड चालू करा. जेव्हा फोन खिशात असतो, तेव्हा चुकून स्क्रीन टच होणं किंवा फिंगरप्रिंट ऑपरेशन टाळता येतं.

First published:

Tags: Smartphone