सोशल मीडियावर खऱ्या नावांची का होतेय लपवाछपवी? अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

सोशल मीडियावर (Social Media) अनेक भारतीय आपली खरी ओळख लपवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. यामागे अनेक कारणं आहेत.

सोशल मीडियावर (Social Media) अनेक भारतीय आपली खरी ओळख लपवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. यामागे अनेक कारणं आहेत.

  • Share this:
मुंबई, 15 डिसेंबर: सोशल मीडियावर (Social Media) आपली खरी ओळख लपवणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ही मंडळी आपलं खरं नाव, फोटो किंवा आपली ओळख पटेल अशी कोणतीही माहिती सोशल मीडिया प्रोफाइलमधून (Profile) उघड करत नाहीत. असं करण्यामागचा हेतू बरेचदा, सायबर फ्रॉड किंवा एखाद्याला त्रास देणं असा असू शकतो असा दावा कॅस्परस्काय (Kaspersky) या जागतिक पातळीवरच्या सायबर सिक्युरिटी (Cyber Security) कंपनीच्या अहवालात करण्यात आला आहे. स्वतःची ओळख गुप्त राखून सोशल मीडियावर वावरण्यासाठी भारतीयांकडून सर्वांत जास्त वापरलं जाणारं माध्यम फेसबुक (Facebook) हे आहे. फेसबुक (76 टक्के), यू-ट्यूब (60 टक्के), इन्स्टाग्राम (47 टक्के) आणि ट्विटर (२८ टक्के) अशी ओळख गुप्त राखणाऱ्या भारतीयांची आकडेवारी कॅस्परस्कायने जाहीर केली आहे. सोशल मीडियावर आपली ओळख लपवल्यामुळे त्यांना बिनधास्तपणे आपल्या भाषणस्वातंत्र्याचा अवलंब करता येतो आणि त्याचबरोबर गैरकृत्यंही केली जातात. सोशल मीडियाचा उगम झाला, तेव्हा आपल्या मित्रांशी, कुटुंबीय-नातेवाईकांशी जोडलं जाणं हा त्याचा उद्देश होता. आता मात्र सोशल मीडिया उत्क्रांत झाला असून, त्याच्या उत्क्रांतीची प्रक्रिया अनपेक्षित मार्गांनी होतच राहील,’ असं मत कॅस्परस्कायचे साउथ एशिया विभागाचे जनरल मॅनेजर दीपेश कौरा यांनी व्यक्त केलं. सोशल मीडियाने समाजातल्या परस्परांची ओळख करून देण्यात मोठं योगदान आहे; मात्र आता अनेक व्यक्ती, तसंच संस्था या दोन्हींचीही आभासी  प्रोफाइल्स (Virtual Profiles) बनवतात,’ असंही कौरा यांनी सांगितलं. सोशल मीडिया प्रोफाइल्स त्यांची खरी ओळख उघड करत नाहीत  हे आशिया पॅसिफिक (Asia Pacific) प्रदेशातल्या 10 पैकी जवळपास 3 संस्थांनी हे मान्य केलं. डिजिटल रेप्युटेशन’ (Digital Reputation) या नावाने नोव्हेंबर महिन्यात एक संशोधनपर सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात आशिया पॅसिफिक प्रदेशातले 1240 जण सहभागी झाले होते. आग्नेय आशियातल्या (South East Asia) 35 टक्के, भारतातल्या 28 टक्के, तर ऑस्ट्रेलियातल्या 20 टक्के जणांनी सोशल मीडियावर आपली खरी ओळख लपवल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं. आपल्या प्रतिमेला धक्का न लावता भाषणस्वातंत्र्याचा (Freedom of Speech) उपभोग घेण्यासाठी आपण खरी ओळख सोशल मीडियावर उघड केलेली नाही, असं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 59 टक्के जणांनी सांगितलं. 53 टक्के जणांनी असं सांगितलं, की ते सोशल मीडियावर अशा काही गुप्त गोष्टी करतात, की ज्या त्यांच्या ‘फ्रेंड्स’ना कळू नयेत. आशिया पॅसिफिक प्रदेशातल्या नागरिकांमध्ये आपल्या ऑनलाइन प्रतिमानिर्मितीबद्दलची जागरूकता वाढीला लागली असून, या प्रतिमेचं खऱ्या आयुष्यातलं महत्त्वही त्यांना उमगलं आहे. ‘सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 49 टक्के जण एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यापूर्वी त्या ब्रँडच्या किंवा कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंट्सला भेट देतात, असं त्यांनी सांगितलं,’ असंही कौरा यांनी म्हटलं आहे. ग्राहक आता कंपन्यांना त्यांच्या ऑनलाइन प्रतिमेवरून जोखतात. तसंच व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याची आर्थिक स्थिती (Credit Score), त्याची नोकरीसाठीची पात्रता (Eligibility), तसंच त्याला व्हिसा नाकारावा की परवानगी द्यावी आदी गोष्टीही ठरवल्या जातात, असंही कौरा यांनी सांगितलं.
Published by:Amruta Abhyankar
First published: