चायनीज अ‍ॅपवर भारतात बंदी; मग Zoom, PUBG आणि WhatsApp वर का नाही?

चायनीज अ‍ॅपवर भारतात बंदी; मग Zoom, PUBG आणि WhatsApp वर का नाही?

भारताने 59 chinese app वर बंदी घातल्यानंतर या अ‍ॅपवरही बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : भारतात 59 चायनीज अ‍ॅपवर (chinese app) बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, ShareIt आणि helo अशा अ‍ॅपचाही समावेश आहे. या 59 अ‍ॅपची यादी जारी केल्यानंतर Zoom, PUBG आणि WhatsApp या अ‍ॅपवर बंदी का घातली नाही, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

भारतात काही चायनीज अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर या तिन्ही अ‍ॅपवरदेखील बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली. या अ‍ॅपवर बंदी का नाही अशी विचारणा नेटिझन्सनी केली.

मात्र खरंच हे अ‍ॅप चायनीज अ‍ॅप आहेत का? मग सरकारने या अ‍ॅपवर बंदी का घातली नाही हे आपण जाणून घेऊयात.

ZOOM APP

सध्या कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत झूम हे अ‍ॅप सर्वात जास्त फायद्याचं ठरत आहे. ऑफिसच्या मिटिंग्ससाठी या अ‍ॅपची मदत होते आहे. आता या अ‍ॅपचा वापर वाढला आहे, त्यामुळे डेटा प्रायव्हेसी धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली.

हे वाचा - Chinese Apps Ban: TikTok सह 59 अ‍ॅप्सवर भारतात बंदी आहे पण ब्लॉक नाही

मात्र झूम किंवा झूम कम्युनिकेशन हे चायनीज कंपनीचं अ‍ॅप नाही तर अमेरिकेन कंपनीचं अ‍ॅप आहे. चायनीज-अमेरिकन एरिक युआन यांच्या कंपनीने हे अ‍ॅप तयार केलं आहे. या कंपनीचं मुख्यालय कॅलिफोर्नियात आहे. युआन हे या कंपनीचे सीईओ आहेत आणि ते अमेरिकेचे नागरिक आहेत.

याआधीदेखील झूम हे चायनीच अ‍ॅप असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्याचवेळी युआन यांनीदेखील हे अ‍ॅप अमेरिकन असल्याचं सांगितलं आहे. तरीदेखील झूम हे चायनीज अ‍ॅप आहे किंवा या अ‍ॅपशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने चीनचा संबंध आहे, असं सर्वांना वाटतं.

PUBG GAME APP

पब्जी या गेमिंग अ‍ॅपबाबतही असाच प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र पब्जीदेखील चिनी कंपनीचा अ‍ॅप नाही. पब्जी अ‍ॅप हे ब्रेंडॅन ग्रिनी या आर्यलँडमधील व्यक्तीने तयार केलेलं अ‍ॅप आहे.

हे वाचा - भारतात 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर पहिल्यांदा चीनने दिली प्रतिक्रिया

दक्षिण कोरियातील ब्लूडॉट (Bluedot) ही व्हिडिओ गेम कंपनी यामध्ये भागीदार आहे. चीनचा पब्जी गेमशी संबंध म्हणजे चीनमधील टेन्सेंट गेम्स ही व्हिडीओ गेम पब्लिशिंग कंपनी चीनमध्येच PUBG  ची भागीदार आहे.

WhatsApp

व्हॉट्सअ‍ॅपदेखील चायनीज अ‍ॅप नाही. मार्क झुकेरबर्ग यांच्या फेसबुकचं हे अ‍ॅप. म्हणजे हेदेखील अमेरिकन कंपनीचं अ‍ॅप आहे आणि सुरक्षेचा विचार करता त्याचा चीनशी काहीही संबंध नाही.

संपादन - प्रिया लाड

First published: June 30, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading