Home /News /technology /

National Technology Day 2022: भारतात11 मे रोजी का साजरा केला जातो हा दिवस?जाणून घ्या इतिहास आणि महत्व

National Technology Day 2022: भारतात11 मे रोजी का साजरा केला जातो हा दिवस?जाणून घ्या इतिहास आणि महत्व

स्वातंत्र्यापूर्वी आधुनिक सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या (Science and Technology) क्षेत्रामध्ये भारत अतिशय मागासलेला होता. स्वातंत्र्यानंतर मात्र भारतानं या क्षेत्रात मोठी प्रगती केली आणि विकास घडवून आणला आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीतील प्रगतीमुळे भारतानं 'पोटेन्शिअल सुपर पॉवर' (Potential Superpowers) देशांच्या यादीत वरचं स्थान मिळवलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 मे-   स्वातंत्र्यापूर्वी आधुनिक सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या (Science and Technology) क्षेत्रामध्ये भारत अतिशय मागासलेला होता. स्वातंत्र्यानंतर मात्र भारतानं या क्षेत्रात मोठी प्रगती केली आणि विकास घडवून आणला आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीतील प्रगतीमुळे भारतानं 'पोटेन्शिअल सुपर पॉवर' (Potential Superpowers) देशांच्या यादीत वरचं स्थान मिळवलं आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी सेक्टरमधील आपलं यश (Success) साजरं करण्यासाठी भारतात दरवर्षी 11 मे रोजी 'नॅशनल टेक्नॉलॉजी डे' (National Technology Day) साजरा केला जातो. 1998 मध्ये याच दिवशी भारतानं पोखरण न्युक्लिअर टेस्ट्स (Pokhran Nuclear Tests) यशस्वीपणे केल्या होत्या. पोखरण न्युक्लिअर टेस्ट्सचं महत्त्व भारताच्या सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्समेंट (Scientific and Technological Advancement) टाइमलाइनमधील सर्वात निर्णायक टप्पा म्हणून पोखरण न्युक्लियर टेस्ट्सकडे पाहिलं जातं. 1998 मध्ये राजस्थानातील (Rajasthan) पोखरण भागात भारतानं यशस्वी अणू चाचण्या केल्या होत्या. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी भारताला स्वतंत्र न्युक्लियर पॉवर बनवण्याच्या या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. पोखरण-II म्हणून ओळखल्या जाणार्‍या या न्युक्लिअर टेस्ट 11 मे 1998 रोजी घेण्यात आल्या होत्या. भारताच्या न्युक्लिअर मिशनला इतर न्युक्लिअर पॉवर्सचा (Nuclear Powers) विरोध होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी चर्चा आणि टीका टाळून भारताला गुप्तपणे हे मिशन पूर्ण करायचं होतं. त्यासाठी सायंटिस्ट, रिसर्चर्स आणि इंजिनीअर्सच्या एक स्पेशल टीमनं या मिशनवर काम केलं होतं. भारतीय लष्कराच्या (Indian Army) पोखरण टेस्ट रेंजमध्ये (Pokhran Test Range) या न्यूक्लिअर टेस्ट घेण्यात आल्या होत्या. पाच स्फोटांची (Explosions) एक सीरिज पूर्ण करून ही टेस्ट यशस्वीपणे पार पाडण्यात आली होती. भारताचे ‘मिसाईल मॅन’ आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) हे पोखरण चाचण्यांचे मार्गदर्शक (Guide) होते. न्युक्लिअर टेस्ट यशस्वी झाल्यानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला न्यूक्लिअर स्टेट (Nuclear State) म्हणून घोषित केलं होतं. जगभरातील त्यावेळच्या पाच न्यूक्लियर देशांच्या क्लबच्या नजरेपासून वाचण्यासाठी या मोहिमेला 'ऑपरेशन शक्ती' (Operation Shakti) असं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं. (Instagram डिलीट करायचं आहे? आधी ही प्रोसेस कराच) या मोहिमेसाठी वापरण्यात आलेलं सर्व तंत्रज्ञान गेल्या दोन दशकांपासून भारतात वापरण्यात आलं होतं त्याच्याआधारे या मोहिमेतही यश आल्यामुळे भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील इतिहासाच्या दृष्टिने या मोहिमेचं यश हा मैलाचा दगड ठरला. या यशामुळे त्या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेने नवी उंची गाठली. भविष्यात कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी आणि सायंटिफिक ऑपरेशन्समध्ये पोखरण न्युक्लिअर टेस्टच्या यशाची उंची गाठण्याचा दृष्टिकोन समोर ठेऊन सर्वांनी काम करावं म्हणून भारतात 11 मे रोजी नॅशनल टेक्नॉलॉजी डे साजरा केला जातो.
    First published:

    Tags: Technology

    पुढील बातम्या