यूट्यूब चॅनल असो वा इन्स्टाग्रामवरील रील्स; आजकाल सर्वांनाच व्हिडिओ एडिटिंगची आवड निर्माण झाली आहे. कित्येक जणांना असं वाटतं, की व्हिडिओ एडिटिंगसाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि महागड्या सॉफ्टवेअर्सची गरज असते. पण तसं नाही. आजकाल सर्वांकडे असलेल्या स्मार्टफोन्सवरही चांगल्या प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग अॅप्स (mobile video editing apps) उपलब्ध झाले आहेत. पाहूयात, व्हिडिओ एडिटिंगसाठी असलेल्या 10 बेस्ट अॅप्सची ‘टीव्ही9 भारतवर्ष’ने केलेली यादी-
काईनमास्टर मोबाईल व्हिडिओ एडिटर
काईनमास्टर (KineMaster) हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असं मोबाईल व्हिडिओ एडिटिंग अॅप आहे. अँड्रॉईड, क्रोम ओएस आणि आयफोन व आयपॅडवर हे अॅप वापरता येतं. यामध्ये कित्येक एडिटिंग फीचर्स मिळतात. मात्र या सर्व फीचर्सचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.
पॉवर डिरेक्टर
पॉवर डिरेक्टर (Power Director) या अॅपची खास बाब म्हणजे, यामध्ये तुम्ही चक्क 4K रिझोल्यूशनचे व्हिडिओही एडिट करू शकता. यासोबतच, बॅकग्राउंड बदलणारं क्रोमा फीचरही यामध्ये वापरता येतं. हे अॅप मोफत असलं, तरी एक्सपोर्ट झालेल्या व्हिडिओवर अॅपचा लोगो दिसतो. हा लोगो हटवण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं.
इनशॉट
सोशल मीडियावर टाकण्यासाठी छोटेछोटे व्हिडिओ लवकर एडिट करण्यासाठी इनशॉट (Inshot)हा चांगला पर्याय आहे. हे अॅप वापरण्यासाठीही अगदी सोपं आहे.
गो प्रो क्विक व्हिडिओ एडिटर अँड मेकर
जर तुम्ही अगदीच नवखे आहात, आणि एखादे स्वस्त आणि सोपे अॅप शोधत आहात; तर गो प्रो (Go Pro Quick) तुमच्यासाठीच आहे. यामध्ये जास्त फीचर्स नसली, तरी बेसिक फीचर्सवर तुमचं काम होऊन जातं.
हे ही वाचा-स्मार्टफोनमधले खासगी फोटो, व्हिडिओ लपवायचे कसे? एका क्लिकवर करा माहिती
क्लिप्स (आयफोन यूझर्ससाठी)
आयफोन यूझर्ससाठी क्लिप्स (Clips) हे एक मोफत व्हिडिओ एडिटिंग अॅप आहे. गो प्रोप्रमाणे हेदेखील वापरण्यासाठी सोपं अॅप आहे.
अॅक्शन डिरेक्टर व्हिडिओ एडिटर
इतर मोफत मोबाईल व्हिडिओ एडिटर्सच्या तुलनेत अॅक्शन डिरेक्टरमध्ये (Action Director) तुम्हाला जास्त फीचर्स मिळतात. त्यामुळे हादेखील एक चांगला पर्याय आहे.
व्हिमिओ
कोणत्याही व्हिडिओला ट्रिम करुन त्यामध्ये इफेक्ट्स, टेक्स्ट आणि इतर गोष्टी एडिट करण्यासाठी या (Vimeo) अॅपचा वापर करता येऊ शकतो.
फिल्मोरा गो
पहिल्यांदाच व्हिडिओ एडिटिंग करणाऱ्यांसाठी हे सर्वोत्तम (Filmora Go) अॅप आहे. याच्या मदतीने चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ एडिट करता येतात. शिवाय पॉवर डिरेक्टरप्रमाणे याचा लोगोही व्हिडिओमध्ये पूर्णवेळ न दिसता, अगदी शेवटी दिसतो.
फिल्मर
हे देखील बेसिक व्हिडिओ एडिटिंगसाठी मोफत (Filmr) अॅप आहे. यामध्ये इतर व्हिडिओ एडिटिंग अॅप्सप्रमाणेच फीचर्स मिळतात.
अॅडोब प्रीमियम रश
अॅडोबने नव्यानेच हे व्हिडिओ एडिटिंग (Adobe Premium Rush)अॅप लाँच केलं आहे. हे क्रॉस डिव्हाइस अॅप आहे. म्हणजेच तुम्ही मोबाईलमध्ये एडिट करता करता अर्ध्यावर सोडलेला व्हिडिओ, कम्प्युटरवर पूर्ण करु शकता. अँड्रॉईड, आयओएस, विंडोज आणि मॅकओएस या सर्वांना हे अॅप सपोर्ट करतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile, Mobile app, Video