कोण चोरतं तुमचा कॉल डेटा?

कोण चोरतं तुमचा कॉल डेटा?

हा सगळा मामला आहे सीडीआर अर्थात तुमच्या फोन डीटेल्सशी निगडीत आणि त्याच्या चोरीशी संबंधित.

  • Share this:

06 फेब्रुवारी : अनावश्यक फोन कॉल्सनी त्रस्त असलेल्या आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो की आपला नंबर सार्वजनिक झालाच कसा? तर त्याला उत्तर सापडलंय. हा सगळा मामला आहे सीडीआर अर्थात तुमच्या फोन डीटेल्सशी निगडीत आणि त्याच्या चोरीशी संबंधित.

रजनी पंडित या देशाच्या पहिल्या महिला गुप्तहेराला अटक झाल्यावर उघडकीस आलं ते सीडीआर चोरीचं प्रकरण. आजवर कधी कुजबुज तर कधी उघडपणे याची चर्चा झाली होती. पण, या प्रकरणात खासगी गुप्तहेराने उतरावं इतकं यात काय दडलंय असा सवाल उपस्थित झालाय.

सीडीआर म्हणजे कॉल डेटा रेकॉर्ड अर्थात तुम्ही कुणाशी आणि कितीवेळ बोलता याचा तपशील. कायद्यानं ही माहिती गोपनीय असली पाहिजे. पण, फक्त १५ हजार रुपायात ही माहिती विकली जातेय. वीमा कंपन्या या माहितीचे मोठे ग्राहक आहेत. अशी माहिती विमा संरक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या खासगी हलचाली आणि आरोग्य विषय्क तप्शील कळू शकतो. विमा कंपन्यांना दावा नाकारायला याचा उपयोग होतो. तुमच्या संभाषणातून तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावला जातो.

मोबाईल आणि त्यावरचं संभाषण हे त्या त्या व्यक्तीची खाजगी गोष्ट आहे. राईट टू प्रायव्हसी अंतर्गत कुणाचाही असा डाटा दुसऱ्याला देणं हे बेकायदेशिर आहे.

अर्थात, सीडीआर चोरी पोलिसांच्या मदतीशिवाय शक्य नसतं. कारण सीडीआर मागवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. त्यामुळं या कामात रजनी पंडीतला पोलिसांनीही मदत केलीये हे स्पष्ट आहे.

First published: February 6, 2018, 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading