बापरे! ओल्या कपड्यापासून बनवली वीज, वाचा कोण आहे हा अवलिया इंजिनीअर

बापरे! ओल्या कपड्यापासून बनवली वीज, वाचा कोण आहे हा अवलिया इंजिनीअर

वाळत घातलेल्या ओल्या कपड्यांपासून वीजनिर्मिती करण्याच्या उपक्रमाला सुरुवात होऊन आता वर्षही पूर्ण होत आहे. या प्रयोगातून निर्माण झालेल्या वीजेतून आतापर्यंत मोबाइल फोन आणि मेडिकल किट्स चार्ज होऊ शकत आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर: लहानपणी आपण शाळेतील पुस्तकांमध्ये वाचलेलं किंवा एखाद्याकडून ऐकलं असेलंच की ओले कपडे घालून विजेसंबंधी कामे करू नये कारण त्याने शॉक लागू शकतो. ओले कापड हे विजेचे एक वाहक (conductor) असतात, हा सिद्धांत गृहित धरून आणि त्याची थियरी समजून त्रिपुरामधील एका इलेक्ट्रिकल इंजिनियरने एक नवीन प्रयोग केला आहे. ओल्या कपड्यांच्या मदतीने त्याने वीज निर्माण केली, ज्यामुळे आता फक्त मोबाइल फोन चार्ज होत नाही तर काही वैद्यकीय उपकरणंही चालू शकतात. या प्रयोगाचं राष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.

शंख शुभ्र दास याला या महिन्यात केंद्र सरकारने गांधीवादी युवा तांत्रिक इनोव्हेशन (GYTI) पुरस्काराने सन्मानित केलं आहे. कपड्यांपासून वीज निर्मिती करण्याऱ्या या अवलियाबद्दल जाणून घेऊया आणि आयआयटीमध्ये असताना त्याने ही संकल्पना कशी राबवली हे देखील जाणून घेऊया.

दास आणि त्यांचे इनोव्हेशन

त्रिपुराच्या सिपाहीजाल जिल्ह्यातील बांग्लादेश सीमेवर खेडाबारी या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या दास यांनी कॅपिलरी अॅक्शन आणि पाण्याचे बाष्पीभवन तत्त्वाला त्यांचा इनोव्हेशनसाठी आधार बनवले. या प्रयोगासाठी दास यांनी एक कापड असं कापलं की ते प्लास्टिकच्या स्ट्रॉच्या आत घालता येईल. यानंतर, एका कंटेनरमध्ये  पाणी भरून त्यात स्ट्रॉचं दुसरं टोक ठेवलं. याशिवाय त्यांनी तांब्याचे दोन इलेक्ट्रोड स्ट्रॉच्या दोन्ही टोकांवर जोडले जेणेकरुन व्होल्टेज मिळू शकेल. कॅपिलेरी अॅक्शनमुळे या प्रयोगातून 700 मिलीग्राम व्होल्टेज रेकॉर्ड केलं गेलं. परंतु, या इतक्या ऊर्जेतून विद्युत उपकरणं चार्ज करणे शक्य नव्हतं, म्हणून दास आणि त्यांच्या टीमने या प्रयोगात सुमारे 30 ते 40 आणखी उपकरणं जोडून वीज निर्मिती करण्याचा निश्चय केला.

(हे वाचा-या राज्यात भाजप करणार Love Jihad विरोधी कायदा; अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद)

या प्रयोगानंतर, सुमारे 12 व्होल्ट वीज निर्मिती केली जाऊ शकते, जी मोबाइल फोन तसेच एक लहान एलईडी बल्ब, हिमोग्लोबिन आणि ग्लूकोज चाचणी किट इत्यादी उपकरणांना चार्ज करू शकेल.

हा एक फंडेड प्रकल्प आहे

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते पुरस्काराने दास यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की,  हा दुर्गम ग्रामीण भागातील वीजनिर्मिती साधनांच्या शोध घेण्याच्या एका उद्देशाने केलेला एक अनुदानित संशोधन प्रकल्प आहे. यात अशी साधनं शोधायची होती जी वजनाने हलकी, स्वस्त आणि टिकाऊ असून ज्यांनी सहजपणे वीज निर्माण केली जाऊ शकते.

(हे वाचा-बंगाली बालेकिल्ल्याला सुरुंग लावायची जबाबदारी भाजपच्या मराठी मोहऱ्यांकडे)

दास याच्या या प्रयोगानंतर आता बायोटेक आणि बायोसायन्समध्ये तज्ज्ञ असलेले मेकॅनिकल इंजिनियर या दिशेने एका चांगल्या आणि टिकाऊ उपकरणाच्या डिझाइनबद्दल विचार करत आहेत. विशेष म्हणजे दास यांनी आयआयटी खडकपूर येथून पीएचडी पदवी घेतली आहे. वर्षभरापूर्वी हाच प्रयोग आयआयटी खडकपूर येथे झाला होता.

आयआयटीमध्ये प्रयोग करण्यात आला

आयआयटी खडकपूरने 2019 मध्ये दुर्गम खेड्यातील धोबी घाट येथे 3000 चौरस मीटरच्या परिसरात ओल्या कपड्यांचा वापर करून वीज निर्मितीचा प्रयोग केला होता. व्यावसायिक सुपर कॅपॅसिटर कनेक्ट करून, सुमारे 10 व्होल्ट वीज तयार केली गेली, जी एका तासासाठी सामान्य एलईडी चालू ठेवू शकते. त्यावेळी या संशोधनात सामील झालेले प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की, “घराबाहेर वाळत टाकलेल्या ओल्या कपड्यांमधून वीज निर्मितीची शक्यता निर्माण झाल्यामुळे हा प्रयोग खूप महत्वाचा आहे".

(हे वाचा- BRICS संमेलनात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे, चीनलाही सुनावलं

दुर्गम भागात जिथे वीजपुरवठ्याची अजूनही अडचण आहे,  तिथे अशा तंत्रज्ञानाद्वारे वीज निर्मिती करण्याच्या उद्देशाच्या दृष्टिकोनातून केलेला हा प्रयोग महत्त्वाचा असल्याचं आयआयटीने म्हटले आहे. तेव्हापासून असे प्रयोग अधिक किफायतशीर आणि चांगल्या पद्धतीने करण्याच्या दिशेने संशोधन चालू आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 18, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या