• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • कोण पाहतंय तुमचं Facebook Profile, सोप्या ट्रिकद्वारे असं घ्या जाणून

कोण पाहतंय तुमचं Facebook Profile, सोप्या ट्रिकद्वारे असं घ्या जाणून

तुमचं फेसबुक अकाउंट (Facebook Account) कोणी पाहिलं का? हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : फेसबुक (Facebook) सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. अनेक जण इतरांचं प्रोफाईल पाहण्यासाठी फेसबुकवर येत असतात. अशात तुमचं फेसबुक अकाउंट (Facebook Account) कोणी पाहिलं का? हे तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता. परंतु कंपनीने हे फीचर अधिकृतपणे जारी केलेलं नाही. फेसबुकमध्ये हा पर्याय दिला जावा, ज्याद्वारे कोणी तुमचं अकाउंट पाहिलं हे जाणून घेता येईल यासाठी अनेकांकडून मागणी होत आहे. अँड्रॉईड किंवा iOS App मध्ये हे फीचर देण्यात आलेलं नाही. परंतु काही डेव्हलपर्सनी दावा केला आहे, की कंप्यूटरमधून फेसबुक अ‍ॅक्सेस करुन याबाबत माहिती मिळू शकते. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची (Third Party App) गरज लागणार नाही. - सर्वात आधी डेस्कटॉपवर Facebook.com पेज ओपन करा. अकाउंट लॉगइन करा. - त्यानंतर Facebook होम पेजवर राइट क्लिक करा आणि view page source पर्यायावर क्लिक करा. - त्यानंतर फेसबुक होमपेजचा सोर्स कोड ओपन होईल. यात BUDDY_ID सर्च करा. BUDDY_ID पुढे नाव लिहिलेलं दिसेल, ज्याने तुमचं प्रोफाईल पाहिलं आहे. त्याशिवाय, नवीन यूआरएलमध्ये BUDDY_ID Facebook.com/Profile ID (BUDDY_ID 15 Digit Code) या पद्धतीने ओपन केल्यास तुम्हाला तुमच्या फेसबुक प्रोफाइल व्हिजिटर्सची माहिती मिळू शकेल.

  Facebook वर तुमचंही Fake Account ओपन झालंय? असं करा डिलीट

  प्रोफाईल कोणी पाहिलं, हे जाणून घेण्यासाठीची फुल प्रुफ पद्धत नाही. परंतु यामुळे तुमचं फेसबुक प्रोफाईल कोणी पाहिलं याची कल्पना मिळू शकते.
  Published by:Karishma
  First published: