नवी दिल्ली, 9 जुलै: प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. पण आधारच्या नावाने अनेक फ्रॉडही (Fraud) होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे याबाबत नेहमी सावध राहण्याची गरज आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्यास आधारद्वारे होणाऱ्या कोणत्याही फ्रॉडपासून वाचता येऊ शकतं. UIDAI ने याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे.
Aadhaar Verification -
सर्व 12 अंकी नंबर आधार नंबर नाही. त्यामुळे तुम्ही आधार ट्रान्झेक्शनबाबत अलर्ट राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्हाला आधार आयडेंटिटी प्रुफ म्हणून मिळतो, त्यावेळी ते वेरिफाय करणं आवश्यक आहे. ऑफलाईन वेरिफिकेशनसाठी तुम्ही आधार किंवा आधार लेटर किंवा पीव्हीसी कार्डवर असलेला क्यूआर कोड मोबाईल फोनवरुन स्कॅन करुन त्यावर माहिती योग्य आहे की नाही ते तपासू शकता.
ऑनलाईन वेरिफिकेशन करायचं असल्यास, यासाठी www.uidai.gov.in वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईटवर 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. त्याशिवाय mAadhaar App वरही वेरिफिकेशन करू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा -
- UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधार कधीही पब्लिक कंप्युटरवर डाउनलोड करू नका. जर कधी असं केलं, तर सिस्टममधून डाउनलोड कॉपी परमनेंटली डिलीट करा.
- कधीही कोणाला आपला आधार ओटीपी शेअर करू नका. UIDAI कडून कधीही पर्सनल डिटेल्स विचारले जात नाहीत.
- तुमच्या आधारमध्ये दुसऱ्याचा नंबर रजिस्टर करू नका. जर संपूर्ण आधार नंबर शेअर करायचा नसेल, तर व्हर्चुअल आयडी किंवा मास्क्ड आधार शेअर करू शकता. ते वॅलिड आहे.
- आधारचा गैरवापर न होण्यासाठी बायोमेट्रिक लॉक करू शकता. www.uidai.gov.in किंवा mAadhaar वर बायोमेट्रिक लॉक करता येईल.
- आधार ट्रान्झेक्शनचं स्टेटमेंटही UIDAI वर पाहता येईल. यात मागील सहा महिन्यात तुमचं आधार कार्ड कुठे वापरण्यात आलं, याबाबत 50 ट्रान्झेक्शनपर्यंतची हिस्ट्री पाहता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card, Tech news